Siram on Astrazeneca Corona Vaccine: कोरोना महामारी रोखण्यासाठी AstraZeneca ने तयार केलेल्या कोविशील्डमुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिमाण होत असल्याची कबुली कंपनीने दिल्यावर खळबळ उडाली होती. दरम्यान, अनेक आरोप झाल्यावर ही बाजारात उपलब्ध असणाऱ्या लसीचे सर्व डोस कंपनीने परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या लसीचे भारतात उत्पादन करणाऱ्या सीरम कंपनीने या लसीबाबत मोठा खुलासा केला आहे. कोविशिल्डचा धोका एस्ट्राझेनका कंपनीने २०२१ मध्येच सांगितला होता असा खुलासा सीरम कंपनीने केला आहे.
AstraZeneca कंपनीने तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लस कोविशिल्डमुळे टीटीएस हा दुर्मीळ दुष्परिणाम होऊ शकतो अशी कबुली कंपनीने लंडन येथील कोर्टात दिली होती. मात्र, हा धोका खूप कमी प्रमाणात असल्याचेही कंपनीने संगितले होते. एस्ट्राझेनका कंपनीने कोविशिल्डमुळे टीटीएस हा दुर्मीळ आजार होतो या बाबत न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये सांगितले होते. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. एस्ट्राझेनका कंपनीच्या खुलास्यानंतर भारतासह जगभरात कोविशिल्डची निर्मिती तसेच वितरण करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने या बाबत महत्वाचा खुलासा केला केला आहे. मोठा खुलासा केला आहे. सीरमने या बाबत महत्वाची माहिती दिली आहे. सीरमने म्हटले आहे की, एस्ट्राझेनकाने कोविशिल्डचा धोक्याबाबत २०२१ मध्येच सांगितले होते, असे स्पष्टीकरण सीरमने दिले आहे.
एस्ट्राझेनकाची कोविशिल्ड लसीचे उत्पादन हे सीरम इन्स्टिट्यूटने केले आहे. भारतासह जगभरातील कोट्यवधी नागरिकांना या लसीचे डोस दिले गेले आहे. कोरोना महामारी पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी सीरमने ही लस तयार केली आहे. या लसीचे डोस भारतात २०२१ व २०२२ मध्ये तयार करून ते देण्यात आले होते. या लसीच्या अनेक मानवी टेस्ट देखील घेण्यात आल्या होत्या. तब्बल १ अब्ज लस तयार करून त्या वितरित करण्यात आल्या होत्या.
कोरोना लसीकरणाचे मानवी शरीरावरील दुष्परिणाम समोर आल्याने कंपनीने या लसीचे सर्व डोस मागे घेतले आहे. बाजारातून लस मागे घेण्याची प्रक्रिया ही ५ मार्च रोजी करण्यात आली होती, जो ७ मे रोजी या बाबत निर्णय घेण्यात आला. AstraZeneca द्वारे निर्मित कोरोना लस TTS - थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसाठी कारणीभूत असल्याचे आढळून आले. AstraZeneca ने बनवलेली Vaxzevria ही लस यूकेसह अनेक देशांना पुरवण्यात आली होती. या लसीमुळे होणारे दुष्परिणामांचा अभ्यास देखील ही कंपनी करत आहे. आजारी व्यक्तीमध्ये रक्त गोठणे, प्लेटलेट कमी होण्याची तक्रार करनेत आली होती. फेब्रुवारीमध्ये न्यायालयीन कामकाजादरम्यान कंपनीने लसीकरणानंतर टीटीएस दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मान्य केले होते.