Anti Corruption Bureau: एसीबी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेलंगणा स्टेट रिअल इस्टेट मॅनेजमेंट अथॉरिटीचे सचिव शिवा बालकृष्ण यांच्या घरी छापा टाकला. या छापेमारीत एसीबी विभागाच्या पथकाला बुधवारी मोठा खजिना मिळाला. शिवा बालकृष्ण यांच्याकडे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची बेहिशोबी मालमत्ता सापडल्याची माहिती आहे. आजही तपास सुरू राहण्याची शक्यता आहे.
एसीबीने बुधवारी शिवा बालकृष्ण यांचे घर आणि कार्यालयासह एकूण २० ठिकाणी छापे टाकले. या छापेमारीत एसीबीला रोख ४० लाख, २ किलो सोने, ६० महागडी घड्याळ आणि १० लॅपटॉपसह मालमत्तेशी संबंधित अनेक कागदपत्र जप्त करण्यात आली. त्यांची एकूण किंमत १०० कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. बालकृष्ण यांच्या घरातून नोटा मोजण्याचे यंत्रही जप्त करण्यात आले. बालकृष्ण यांच्या नावावर असलेल्या ४ बँकामधील लॉकर्स उघडले जाणार आहेत. बालकृष्ण यांच्या नावावर असलेल्या ४ बँकांमधील लॉकर्स उघडले जाणार अहेत.
बालकृष्ण हे तेलंगणा रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण चे सचिव आहेत. ते हैदराबाद महानगर विकास प्राधिकरणाचे माजी संचालकही होते. बालकृष्ण यांनी अनेक रिअल इस्टेट कंपन्यांना परमिटची सुविधा देऊन कोट्यवधी रुपये कमावल्याच्या आरोपाखाली एसबीसीने त्यांच्या घरात छापे टाकले.
दरम्यान, २४ जानेवारीला पहाटे ५ वाजता हैदराबाद येथील बालकृष्ण यांच्या घराची झडती सुरू झाली. पथकांनी एकाच वेळी २० ठिकाणी छापे टाकले. अधिकाऱ्यांना झडतीनंतर आणखी पैसे आणि मालमत्ता सापडण्याची अपेक्षा आहे. पदाचा गैरवापर करून मालमत्ता बळकावल्याप्रकरणी बालकृष्ण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या ठिकाणांची झडती गुरुवारीही सुरू राहू शकते.