आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे आई-वडिलांनी पोटच्या मुलाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ७१वर्षीय व्यक्ती व ५५वर्षीय त्याच्या पत्नीला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दोघांवर आरोप केला आहे की, त्यांनी गतिमंद असलेल्या आपल्या ३२ वर्षीय मुलाची मारहाण करून हत्या केली. दोन दिवसानंतर तरुणाचा मृतदेह एका तलावात तंरगताना आढळला. त्यानंतर काही वेळातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये आई-वडील आपल्याच मुलाला काठीने बेदम मारहाण करताना दिसत आहेत.
सुहैल अहमद असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण करीमगंज येथील पुरहुरिया परिसरात रहात होता. हा परिसर भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरुण अनेक वर्षापासून आपल्या आई-वडिलांसोबत रहात होता. लोकांनी सांगितले की, सुहैलला मानसिक आजार होता. त्याच्या विचित्र वर्तनाने त्याचे पालक कंटाळले होते. त्यांनी सांगितले की, सुहैलने शुक्रवारी आपल्याच घरात आग लावण्याचा प्रयत्न केला होता. हे पाहून त्याचे आई-वडील भडकले व त्यांनी त्याला काठीने बेदम मारले.
स्थानिक लोकांनी सांगितले की, सुहैलला खूप वेळ काठीने मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता नव्हता. मात्र रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्याची डेडबॉडी तलावात तंरगताना दिसली. घटनेची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. तसेच मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ त्यांनी पाहिला आहे. मात्र आरोपी आई-वडिलांनी दावा केला की, ही घटना खूप जुनी आहे. दुसरीकडे लोकांनी सांगितले की, पालकांच्या बेदम मारहाणीत सुहैलचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चौकशी केली जात आहे.
मध्य प्रदेश मधील रीवा शहरात ९ वर्षीय चिमुकलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात धक्कादायक तथ्य समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, चिमुकलीच्या भावाने मोबाइलवर अश्लील व्हिडिओ पाहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व त्यानंतर तिची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, मृत मुलीची आई व दोन मोठ्या बहिणींनी हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला. ५० लोकांकडे चौकशी व आरोपीची चौकशी तसेच परिस्थितीजन्य पुरावे गोळा केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. याप्रकरणी मृत मुलीचा १३ वर्षीय भाऊ, तिची आई व १७ व १८ वर्षांच्या दोन बहिणींना ताब्यात घेण्यात आले आहे.