मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Asim Munir Pakistan New Army Chief Pulwama Attack Connection 40 Crpf Jawans Martyr

Asim Munir : असीम मुनीर पाकचे नवे लष्करप्रमुख.. ISI चेही होते प्रमुख, पुलवामा हल्ल्याशीही कनेक्शन

असीम मुनीर पाकचे नवे लष्करप्रमुख
असीम मुनीर पाकचे नवे लष्करप्रमुख
Shrikant Ashok Londhe • HT Marathi
Nov 24, 2022 04:48 PM IST

Asim Munir Pakisthan new Army Chief : लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांची पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी मुनीर आएसआय प्रमुख राहिले आहेत. तसेच त्यांचे पुलवामा हल्ल्याशीही कनेक्शन आहे.

Pakistan new army chief Asim munir : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी लेफ्टनंट जनरल असीम मुनीर (Asim munir) यांची देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली. मुनीर हे जनरल कमर जावेद बाजवा यांची जागा घेतील. याशिवाय लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांना चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याशी संबंध आहे. पुलवामा हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते.

ट्रेंडिंग न्यूज

लेफ्टनंट जनरल असीम मुनीर हे पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख असतील. ते आयएसआयचे प्रमुख राहिले आहेत. इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. असीम २०१८-२०१९ मध्ये ८ महिने ISI प्रमुख होते. सत्तेत आल्यानंतर इम्रान खान यांनी त्यांचे जवळचे सहकारी फैज हमीद यांना आयएसआय प्रमुख बनवले आणि मुनीर यांची गुजरांवाला कॉर्प्स कमांडर म्हणून बदली केली.

असीम यांना २०१८ मध्ये टू-स्टार जनरल पदावर बढती मिळाली होती, परंतु दोन महिन्यांनंतर ते या पदावर रुजू झाले. त्यांचा लेफ्टनंट जनरल म्हणून ४ वर्षांचा कार्यकाळ २७ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.

पुलवामा हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख असीम मुनीर हे पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI)चे प्रमुख म्हणून काम करत होते. पुलवामा हल्ल्यामागे पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात होता. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयवर अनेक दिवसांपासून दहशतवादी संघटनांना पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे. अशा परिस्थितीत आता शेजारी देशाने त्या जनरलला नवा लष्करप्रमुख निवडला आहे, जो पुलवामा हल्ल्याच्या वेळी आयएसआयचा प्रमुख होता, त्यामुळे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या कारणास्तव भारतानेही शेजारील देशात घडणाऱ्या घटनांवर बारीक नजर ठेवली आहे.

पुलवामा हल्ल्यात ४० CRPF जवान झाले होते शहीद -
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावर CRPF जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला आणि ४० जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मदने पुलवामा जिल्ह्यातील अवंती पोराजवळील लेथपेरो भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर, २६ फेब्रुवारी रोजी भारताने बालाकोट एअर स्ट्राइक करून हल्ल्याचा बदला घेतला. हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी मारले गेले होते.

लष्करप्रमुख मुनीर यांच्याबद्दल अधिक माहिती -
लेफ्टनंट जनरल मुनीर ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल (OTS) कार्यक्रमातून पदवी घेतल्यानंतर फ्रंटियर फोर्स रेजिमेंटमध्ये सामील झाले.ते सीओएएसचे निकटचे सहकारी राहिले आहेत.ते जनरल बाजवा यांच्या नेतृत्वाखाली फोर्स कमांड नॉर्दर्न एरियामध्ये ब्रिगेडियर होते, जे त्यावेळी कमांडर एक्स कॉर्प्स होते. नंतर त्यांची २०१७ च्या सुरुवातीला डीजी मिलिटरी इंटेलिजन्स आणि पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयएसआय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली, डॉनने हे वृत्त दिले आहे.

संबंधित बातम्या

विभाग