Jyothi Yarraji: भारतीय महिला अॅथलीट ज्योती याराजीनं आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत रौप्यपदक पटकावले. मात्र, या पदकासाठी ज्योति याराजीला आधी मैदानात आणि त्यानंतर पंचाशी झगडावे लागले. चीनी खेळाडू वू यानी हिने चुकीच्या पद्धतीने शर्यतीची सुरुवात करून रौप्यपदकावर मोहर उमटवली. मात्र, ज्योति आणि इतर अॅथलीटने वू यानीची चूक पंचाच्या लक्षात आणून दिली. ज्यामुळे कांस्यपदक विजेता म्हणून घोषित करण्यात आलेल्या ज्योतिला रौप्यपदक मिळाले.
चीनची खेळाडू वू यानीने चुकीच्या पद्धतीने शर्यतीची सुरुवात केली. तिने शर्यत सुरू होण्यापूर्वीच धाव घेतली, जी चुकीची ठरवण्यात आली. वू यानी आणि ज्योति याराजी एकमेकांच्या बाजुला उभा होत्या. पंचांनी दोघांची सुरुवात चुकीची असल्याचे सांगत त्यांना बोलावून घेतले. याला भारतीय खेळाडूंनी कडाडून विरोध दर्शवला. यानंतर पंचांनी व्हिडिओच्या माध्यमातून तपासले असता वू यानी सुरुवात चुकीची ठरली आणि ज्योति याराजीला रौप्यपदक विजेता म्हणून घोषिक केले.
दरम्यान, १०० मीटर अडथळा शर्यतीमध्ये ज्योति याराजीने १२.९१ सेकंदाचा वेळ घेतला. तर, वू यानीने अवघ्या १२.७६ सेकंदात शर्यत पूर्ण केली. या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या वू यानीला रौप्यपदक आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ज्योती याराजीला कांस्यपदक घोषित करण्यात आले. परंतु, यू यानी चुकीच्या पद्धतीने सुरुवात केल्याने तिला अपात्र ठरवले. यामुळे ज्योति याराजीला रौप्यपदक आणि जपानची अॅथलीट तनाका यूमिला कांस्यपदक मिळाले, जिने १३. ०४ सेकंदात शर्यत पूर्ण केली.
संबंधित बातम्या