Asaduddin Owaisis : राहुल गांधी वायनाडमधून केवळ ‘या’ कारणामुळेच जिंकले; ओवैसींचा INDIA आघाडीवर निशाणा-asaduddin owaisis attack on india alliance say rahul gandhi won wayanad because of muslim league ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Asaduddin Owaisis : राहुल गांधी वायनाडमधून केवळ ‘या’ कारणामुळेच जिंकले; ओवैसींचा INDIA आघाडीवर निशाणा

Asaduddin Owaisis : राहुल गांधी वायनाडमधून केवळ ‘या’ कारणामुळेच जिंकले; ओवैसींचा INDIA आघाडीवर निशाणा

Sep 19, 2023 10:10 PM IST

Asaduddin owaisi on rahul gandhi : राहुल गांधी वायनाडमधूनविजयी होण्याचे कारण म्हणजेतिथे मुस्लीम लीग आहे. मुस्लीम लीगने राहुल गांधींना बुडताना वाचवले, असे म्हणत औवेसींनीकाँग्रेसवरहल्लाबोल केला.

Asaduddin owaisi on rahul gandhi
Asaduddin owaisi on rahul gandhi

विरोधकांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजप आणि मोदींना विरोध करत एकजुट केली आहे. मात्र इंडिया आघाडीच्या बैठकीला एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन औवेसींना बोलावण्यात आले नाही. त्यामुळे, त्यांनी एकला चलो रे.. अशी भूमिका घेत इंडिया आघाडीवर जोरदार प्रहार केला आहे. ओवैसी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडूक लढले. अमेठी मतदारसंघातून ते पराभूत झाले. मात्र, वायनाड येथून तेजिंकले. वायनाडमधून विजयी होण्याचे कारण म्हणजे तिथे मुस्लीम लीग आहे. मुस्लीम लीगने राहुल गांधींना बुडताना वाचवले, असे म्हणत औवेसींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी देशात भाजपा आणि मोदी सरकारविरुद्ध इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. मात्र, या इंडिया आघाडीत एमआयएमला स्थान नसल्याचे दिसून येते. त्यावरुन, औवैसींनी या आघाडीवर निशाणा साधला आहे. खासदार असदुद्दीन औवेसी यांनी आता इंडिया आघाडीवर प्रहार करताना, म्हटले की, इंडिया आघाडीशी आपले काही देणं-घेणं नाही. केवळ हिंदू व्होट बँक नाराज होईल, हिंदूंची मतं आपल्याल मिळणार नाहीत, या भीतीने इंडिया आघाडीत आपल्याला विचारणा केली नसल्याचं औवेसींनी म्हटलंय.

 

मुसलमानांनी सरपंच ते संसद सर्व निवडणून लढवावी -

त्याचबरोबर औवेसी यांनी म्हटलं की, मुसलमांनी निवडणूक लढवायला पाहिजे. मग, ती निवडणूक सरपंचपदाची असो किंवा संसदेची असो. जोपर्यंत मुसलमान निवडणूक लढणार नाही, तोपर्यंत तुम्ही जिंकणार नाहीत. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला अगोदर एक-दोन वेळेस हरावं लागेल, असे म्हणत औवेसींनी मुस्लिमांना निवडणूक लढवण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं.