Asaduddin Owaisi : सरकारी कर्मचारी RSS चे सदस्य झाल्यास देशाशी प्रामाणिक राहणार नाहीत, ओवैसी यांची टीका
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Asaduddin Owaisi : सरकारी कर्मचारी RSS चे सदस्य झाल्यास देशाशी प्रामाणिक राहणार नाहीत, ओवैसी यांची टीका

Asaduddin Owaisi : सरकारी कर्मचारी RSS चे सदस्य झाल्यास देशाशी प्रामाणिक राहणार नाहीत, ओवैसी यांची टीका

Jul 22, 2024 06:08 PM IST

Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले की, सरकारने आरएसएसच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना असलेली बंदी हटवल्याचे समजते. जर हे सत्य असेल तर देशाच्या अखंडतेच्या विरोधात आहे.

असदुद्दीन ओवैसी
असदुद्दीन ओवैसी

Assauddin Owaisi News : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या कार्यक्रमात सहभागी होण्यास बंदी लादली होती. ती बंदी आता हटवल्याचे सांगितले जात आहे. सर्वात आधी हा दावा काँग्रेसने केला त्यानंतर या मुद्द्यावरून एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले की, जर कोणी सरकारी कर्मचारी आरएसएसचा सदस्य असेल तर तो देशाप्रती प्रमाणित राहू शकत नाही. याचे कारण आहे की, आरएसएस संविधान आणि तिरंग्याच्या विरोधात राहिला आहे.

केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना ओवैसी यांनी कामगार मंत्रालयकाडून जारी एक ऑफिस मेमोरेंडम शेअर केले आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची असलेली बंदी हटवल्याचे सांगितले आहे. सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर सरकारी आदेश पोस्ट करत ओवैसी यांनी म्हटले की, जर हे सत्य असले तर भारताची अखंडता आणि एकतेच्या विरोधात आहे.

RSS सदस्य देशाहून हिंदुत्व वरती असल्याची शपथ घेतात - ओवैसी

असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले की, सरकारने आरएसएसच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना असलेली बंदी हटवल्याचे समजते. जर हे सत्य असेल तर देशाच्या अखंडतेच्या विरोधात आहे.

आरएसएसवर बंदी होती कारण त्यांनी संविधान,राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्रगीत स्वीकार करण्यास नकार दिला होता. प्रत्येक आरएसएस सदस्य हिंदुत्वाला देशाहून मोठे मानतो, तशी शपथ त्याला दिली जाते. कोणीही सरकारी कर्मचारी जर आरएसएसचा सदस्य असेल तर तो देशाप्रती प्रमाणिक राहू शकत नाही.

काँग्रेसनेही या मुद्द्यावर मोदी सरकारला घेरले आहे. पार्टी महासचिव जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, १९४८ मध्ये गांधीजींच्या हत्येनंतर सरदार पटेल यांनी आरएसएसवर बंदी लादली होती. त्यानंतर चांगल्या वर्तवणुकीचे आश्वासन दिल्यानंतर ही बंदी हटवली होती. त्यानंतरही आरएसएसने नागपूरमध्ये कधी तिरंगा फडकावला नाही.

५८ वर्षे जुना आदेश घेतला मागे -

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच मोठा निर्णय घेतला आहे. मोदींनी संघाच्या कार्यक्रमात आणि शाखेत सरकारी कर्मचाऱ्यांनी जाऊ नये, हा आदेश मागे घेतला हा. इंदिरा गांधींनी ५८ वर्षापूर्वी ही बंदी घातली होती.

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना ३० नोव्हेंबर १९६६ रोजी सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल, शाखेत जाण्याबद्दल बंदी आदेश काढला होता. यामुळे बरेचशे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी संघाच्या विचारसरणीचे असूनही त्यांना उघडपणे संघाच्या कार्यक्रमात जात येत नव्हते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर