रात्री मित्रांसोबत मॅगी खायला गेला होता १२ वीचा विद्यार्थी; गोरक्षकांनी ३० किलोमीटरपर्यंत पाठलाग करत केली हत्या-aryan mishra murder case faridabad student shot dead mistakenly in suspect of cow smuggler ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रात्री मित्रांसोबत मॅगी खायला गेला होता १२ वीचा विद्यार्थी; गोरक्षकांनी ३० किलोमीटरपर्यंत पाठलाग करत केली हत्या

रात्री मित्रांसोबत मॅगी खायला गेला होता १२ वीचा विद्यार्थी; गोरक्षकांनी ३० किलोमीटरपर्यंत पाठलाग करत केली हत्या

Sep 03, 2024 04:12 PM IST

AryanMishramurdercase : गोरक्षकांनी गोवंश तस्कर समजून बारावीत शिकणाऱ्या आर्यन मिश्रा ची गोळ्या झाडून हत्या केली. मृत विद्यार्थी रात्री मित्रांसोबत मॅगी खाण्यासाठी बाहेर गेला होता. आरोपींनी पीडितेच्या कारचा ३० किलोमीटरपर्यंत पाठलाग केला आणि नंतर त्याची हत्या केली.

 गोवंश तस्कर समजून बारावीत शिकणाऱ्या आर्यन मिश्रा याची हत्या
गोवंश तस्कर समजून बारावीत शिकणाऱ्या आर्यन मिश्रा याची हत्या

देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या हरयाणातील फरिदाबादमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीत शिकणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याची गोरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. गोमांस आणि गो-स्करीच्या कारणास्तव देशात विविध ठिकाणी मारहाण व मॉम लिचिंगच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी हरिणामध्ये पश्चिम बंगालच्या एका मजुराची गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मॉब लिंचिंग करण्यात आले होते. त्याचबरोबर जळगावमधील एका वृद्धाला गोमांस बाळगल्याप्रकरणी रेल्वेत मारहाण करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता मॉब लिचिंगची आणखी एक घटना समोर आली आहे.

हरियाणाच्या फरीदाबादमध्ये गायींच्या तस्करीवरून २३ ऑगस्ट रोजी हरियाणामधील फरीदाबाद येथे पाच जणांनी एका १९ वर्षीय विद्यार्थ्याच्या गाडीचा ३० किमीपर्यंत पाठलाग करत त्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. याप्रकरणी आता पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मित्रांसोबत मॅगी खाण्यासाठी कारमधून बाहेर पडलेल्या आर्यन मिश्राचा ३० किलोमीटरपर्यंत पाठलाग करून खून करण्यात आला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. अशा कारमधून तस्कर येणार असल्याची माहिती मिळाल्याचे आरोपींनी म्हटले आहे.

आर्यन मिश्रा हत्या प्रकरणात सौरभ, अनिल कौशिक, वरुण, कृष्णा आणि आदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या सर्वांना न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवले आहे. फरिदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखा सेक्टर-३० चे पथक या हत्येचा तपास करत आहे.

काय आहे घटना ?

२३ ऑगस्टच्या रात्री आर्यन मिश्रा आपल्या घरमालक आणि त्याच्या परिचितांसह डस्टर कारमधून मॅगी खाण्यासाठी बडखल येथील एका मॉलमध्ये गेला होता. तेथून रात्री उशिरा परतत असताना आरोपींनी पटेल चौकात त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यावर कार चालवणाऱ्या आर्यनच्या एका ओळखीच्या व्यक्तीने भीतीपोटी गाडीचा वेग वाढवला. यानंतर आरोपींनी आर्यन आणि त्याच्या गाडीचा सुमारे ३० किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. त्यानंतर दिल्ली आग्रा-महामार्गावरील गडपुरी टोलच्या जवळ स्वत:ला गोरक्षक म्हणवून घेणाऱ्या आरोपींनीन तो गो-तस्कर असल्याचा संशय घेऊन आर्यनला गोळ्या घातल्या. या गोळीबारात जखमी झालेल्या आर्यनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चौकशीत सांगितले की, २३ ऑगस्टच्या रात्री त्यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, डस्टर आणि फॉर्च्युनर कारमधून काही पशुतस्कर शहरात रेकी करत आहेत. तसेच जिथे जनावरे मिळत आहेत, तेथे कंटेनर मागवून ते उचलत आहेत. या माहितीनंतर अनिल कौशिक व त्याचे साथीदार शहरात एका कारमधून त्या पशुतस्करांचा शोध घेत होते. यावेळी पटेल चौकात त्यांना एक डस्टर कार दिसली. आरोपीने कार चालकाला थांबण्यास सांगितले, मात्र कार चालविणाऱ्या व्यक्तीने भीतीपोटी वेग वाढवला. यामुळे गैरसमजातून त्याने गाडीचा पाठलाग करून गोळीबार केला, ज्यात आर्यन मिश्राचा मृत्यू झाला.

विभाग