दिल्लीत केजरीवालांचे एकला चलो रे! कोणत्याही पक्षाची आघाडी न करता दिल्ली विधानसभा स्वतंत्र लढण्याची घोषणा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दिल्लीत केजरीवालांचे एकला चलो रे! कोणत्याही पक्षाची आघाडी न करता दिल्ली विधानसभा स्वतंत्र लढण्याची घोषणा

दिल्लीत केजरीवालांचे एकला चलो रे! कोणत्याही पक्षाची आघाडी न करता दिल्ली विधानसभा स्वतंत्र लढण्याची घोषणा

Dec 01, 2024 02:48 PM IST

arvind kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी ची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.

दिल्लीत केजरीवालांचे एकला चलो रे! कोणत्याही पक्षाची आघाडी न करता दिल्ली विधानसभा स्वतंत्र लढण्याची घोषणा
दिल्लीत केजरीवालांचे एकला चलो रे! कोणत्याही पक्षाची आघाडी न करता दिल्ली विधानसभा स्वतंत्र लढण्याची घोषणा (PTI)

Arvind Kejriwal on Delhi Assembly Eletion : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आम आदमी पक्ष दिल्लीत कोणाशीही युती करणार नाही आणि एकट्याने निवडणूका लढवेल असे त्यांनी म्हटलं आहे. याआधी काँग्रेसनेही दिल्ली विधानसभा निवडणुकीत युतीची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली होती. मात्र, अरविंद केजरीवाल यावर काहीही बोलले नाहीत. पण आज त्यांनी देखील  काँग्रेस आणि आपच्या युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला झाला होता. या  हल्ल्यासंदर्भात अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना दिल्ली निवडणुकीतील युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना केजरीवाल यांनी दिल्लीत काँग्रेससोबत युती करणार नसल्याचं स्पष्ट केलं. 

दिल्लीत पुढील वर्षाच्या सुरुवातीला ७० विधानसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. सध्या ७०  पैकी ६२ जागांवर आम आदमी पक्षाचे आमदार निवडून आले आहेत.  या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने भाजपविरोधात एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र, लोकसभेच्या सातपैकी एकही जागा दोन्ही पक्षांना जिंकता आल्या नाहीत. इतकंच नाही तर निवडणुकीतील पराभव आम आदमी पक्षामुळे झाल्याचंही काँग्रेसने आरोप केला होता.  

दुसरीकडे हरयाणा विधानसभा निवडणुकीनंतरही काँग्रेस आणि आपमध्ये युती होणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी 'आप' आणि काँग्रेस नेत्यांच्या  चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही जागावाटपाबाबत एकमत होऊ शकले नाही. त्यावेळी आम आदमी पक्षाने भविष्यात  काँग्रेससोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यावर आज  अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.  

दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनता तिसऱ्यांदा सत्तेच्या चाव्या आपकडे सोपवेल, असा विश्वास आम आदमी पक्षाला आहे. आम आदमी पक्षाने  निवडणूक प्रचार देखील सुरू केला आहे.  शिवाय काही जागांवर उमेदवारांची नावेही जाहीर केली आहे. 

 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर