मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind Kejriwal : केजरीवालांनी रचला होता कट, गुन्ह्यातील रक्कम वापरण्यात व लपवण्यात त्यांचा हात; कोर्टाची मोठी टिप्पणी

Arvind Kejriwal : केजरीवालांनी रचला होता कट, गुन्ह्यातील रक्कम वापरण्यात व लपवण्यात त्यांचा हात; कोर्टाची मोठी टिप्पणी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 09, 2024 06:12 PM IST

Arvind Kejriwal : कोर्टाने म्हटले की, ईडीने सादर केलेल्या कागदपत्रांवरून समजते की, अरविंद केजरीवाल यांनी कट रचला होता आणि गुन्ह्यातील रक्कम (liquorscam) वापरण्यात व लपवण्यात त्यांचा हात होता.

केजरीवालांबाबत न्यायालयाची मोठी टिप्पणी
केजरीवालांबाबत न्यायालयाची मोठी टिप्पणी

दिल्ली हायकोर्टाने (delhi high court ) मंगळवारी दारू घोटाळ्याशी (liquor scam) संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. यावेळी  कोर्टाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याबाबत मोठी टिप्पणी केली. कोर्टाने म्हटले की, ईडीने सादर केलेल्या कागदपत्रांवरून समजते की, अरविंद केजरीवाल यांनी कट रचला होता आणि गुन्ह्यातील रक्कम वापरण्यात व लपवण्यात (Arvind Kejriwal conspired involved in proceeds of crime material) त्यांचा हात होता. ते आम आदमी पार्टीचे संयोजक म्हणूनही यामध्ये सहभागी होते. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी केजरीवाल यांच्या याचिकेवर निर्णय देताना म्हटले की, कोणालाही विशेषाधिकार दिला जाऊ शकत नाही. तपासाकामी चौकशी करण्यास मुख्यमंत्र्यांना सूट दिली जाऊ शकत नाही.

ट्रेंडिंग न्यूज

हायकोर्टाने म्हटले की, एमएस रेड्डी आणि शरत रेड्डी यांनी आपली साक्ष दिली आहे. न्यायालय ट्रायल कोर्टची जागा घेऊ शकत नाही व मिनी ट्रायल करणार नाही. कोर्टाने म्हटले की, 'ईडीकडे पुरेसे पुरावे असल्यामुळे आरोपींना अटक करावी लागली. केजरीवाल यांच्या अटकेला विलंब झाल्याने याचा परिणाम आधीपासून तुरुंगात असणाऱ्यांवर पडला. खंडपीठाने ही मागणीही फेटाळून लावली की, अरविंद केजरीवाल यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून चौकशी केली जाऊ शकली असती. कोर्टाने म्हटले की, तपास कसा केला जावा, हे निश्चित करणे आरोपीचे काम नाही. आरोपीच्या सुविधेनुसार हे काम होऊ शकत नाही.

याचिकेवर निकाल देताना दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केले की, अप्रूवरचा कायदा १०० वर्षे जुना आहे. हा काही एक  वर्षापूर्वीचा कायदा नाही. यामुळे असे होऊ शकत नाही की, याचिकाकर्त्याला अडकवण्यासाठी हा बनवला गेला आहे. 

आदेश देताना हायकोर्टाने म्हटले की, अरविंद केजरीवाल यांच्या जामीनावर विचार केला जाऊ शकत नाही. केवळ  अटकेविरोधात त्यांच्या याचिकेवर निर्णय देत आहे. कोर्टाने म्हटले की, खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी साक्षीदारांच्या साक्षीवर निर्णय घेतला जाईल. तेव्हा अरविंद केजरीवाल युक्तीवाद करू शकतात. कोर्टाने म्हटले की,  न्यायालये राजकीय नैतिकतेशी संबंधित नसून घटनात्मक नैतिकतेशी संबंधित आहेत. अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांच्या ईडी रिमांडला अवैध ठरवले जाऊ शकत नाही. त्याचबरोबर हायकोर्टाने केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आव्हान देणारी याचिका फेटाळली.

IPL_Entry_Point