मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind Kejriwal : गुजरातमध्ये केजरीवालांचा रिक्षामधून प्रवास, पोलिसांनी रोखल्यावर भडकले, पाहा VIDEO

Arvind Kejriwal : गुजरातमध्ये केजरीवालांचा रिक्षामधून प्रवास, पोलिसांनी रोखल्यावर भडकले, पाहा VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 12, 2022 11:04 PM IST

गुजरात दौऱ्यात केजरीवाल (ArvindKejriwal) एकाऑटोमधून प्रवास करू लागले. मात्र सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी त्यांची रिक्षा पुढे जाण्यापासून रोखली. यावरअरविंद केजरीवालयांचा पारा चढला. पोलीस कर्मचाऱ्यांवर संतप्त झालेल्याअरविंद केजरीवालयांचाएकव्हिडिओ समोर आला आहे.

गुजरातमध्ये केजरीवालांचा ऑटोमधून प्रवास
गुजरातमध्ये केजरीवालांचा ऑटोमधून प्रवास

आम आदमी पार्टीचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरात दौऱ्यात ते एकाऑटोमधून प्रवास करू लागले. मात्रसुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी त्यांची रिक्षा पुढे जाण्यापासून रोखली. यावर अरविंद केजरीवाल यांचा पारा चढला. पोलीस कर्मचाऱ्यांवर संतप्त झालेल्या अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, केजरीवाल आणि पक्षाचे काही नेते एक ऑटोमध्ये प्रवास करत आहेत. मात्र पोलीस ही ऑटो पुढे जाऊ देत नाहीत. त्यानंतर नाराज केजरीवाल कहते हैं -

आज गुजरातची जनता यामुळे दु:खी आहे की, नेते जनतेमध्ये जात नाहीत. आम्ही जनतेमध्ये मिसळत आहोत आणि तुम्ही आम्हाला रोखत आहात. हाच प्रोटोकॉल आहे का तुमच्या गुजरातचा?यामुळेच तुमच्या नेत्यांनी जनतेला दुखी केले आहे. नेत्यांना सांगा की, थोडा प्रोटोकॉल तोडून जनतेमध्ये मिसळा. जनता खूप दु:खी आहे तुमच्या नेत्यांमुळे. आम्हाला तुमची सुरक्षा नको. तुम्ही जबरदस्ती करत आहात. तुम्ही अशा प्रकारे आम्हाला कैद करून ठेवले आहे.

 

पोलिसांनी केजरीवाल यांना रोखल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचे लोक जनतेच्या नेत्याला लोकांमध्ये जाण्यापासून रोखत आहेत. केजरीवाल जनतेत मिसळत असल्याने त्याची भाजपला धसकी आहे. दुसरीकडे, दिल्ली भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करत केजरीवालांवर हल्ला चढवला आहे. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने केजरीवाल यांना विशेष संरक्षण देण्याची मागणी करणारे पत्र प्रशासनाला दिले होते. केजरीवाल यांच्यावर हिंसक हल्ला होऊ शकतो, असे पत्रात लिहिले होते. केजरीवाल यांच्याकडे ३२ सरकारी वाहने आहेत. असा तमाशा करणे लज्जास्पद आहे,' अशी टीका मिश्रा यांनी केली आहे.

अरविंद केजरीवालांनीभाजपवर निशाणा साधताना म्हटले की,माझ्यावर फ्री कल्चरचा आरोप केला जातो. मात्र सर्वांना मोफत शिक्षण मिळणे आवश्यक आहे. आरोप करणारे आपल्यामुलांना परदेशात शिकवतात आणि आम्ही दिलेल्या मोफत शिक्षणावर प्रश्न उपस्थित करतात. त्यांना मतदान करण्यात अर्थ नाही. जर तुम्ही त्यांना मत दिले तर तुमच्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होईल. गुजरातमध्येआपचेसरकार आल्यास चांगले आणि मोफत उपचार मिळतील. वीज फुकट दिली जाईल, १८ वर्षांवरील मुलींना दरमहा १ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी आश्वासने यावेळी केजरीवालांनी दिली.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या