मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अ‍ॅम्ब्युलन्ससोबत रुग्णालयात जाणारी कार दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील पाच जण ठार

अ‍ॅम्ब्युलन्ससोबत रुग्णालयात जाणारी कार दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील पाच जण ठार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 27, 2024 09:33 PM IST

Arunachal Pradesh Kamle Car Accident: मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला.

Kamle district superintendent of police (SP) Thutan Jamba said five of the six members died on the spot but miraculously, the little girl survived (Getty Images/iStockphoto)
Kamle district superintendent of police (SP) Thutan Jamba said five of the six members died on the spot but miraculously, the little girl survived (Getty Images/iStockphoto)

Car Rolled Down Into Gorge in Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशातील कामले जिल्ह्यात महामार्गावरून घसरून १५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने, चार वर्षांची मुलगी या अपघातात बचावली. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला.सदर कार अ‍ॅम्ब्युलन्ससोबत रुग्णालयात जात होती.

कुटुंबातील सदस्य दापोरिजो शहराजवळ चहापिण्यासाठी कुठेतरी थांबले होते. ते पुन्हा रस्त्यावर आल्यानंतर बोलेरो चालकाने रुग्णवाहिकेचा पाठलाग केला, जी विनाअडथळा धावत होती. मात्र, कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तब्बल चार तासांनंतर सगळ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, अशी माहिती कामले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक थुतन जांबा यांनी दिली. सहापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, चमत्कारिकरित्या चार वर्षांची चिमुकली बचावली, अशी माहिती जांबा यांनी दिली.

या चिमुकलीला पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तानिया युडिक (वय, ४०), ताजुम नुक (वय, २४), पाकमार पाकसोक (वय, २१), बेतो मार्डे (वय, २४) आणि गेटोर पगमेन (वय, ३३) अशी मृतांची नावे आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी नाहरलागुन रुग्णालयात पाठविण्यात आले आणि नंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

IPL_Entry_Point

विभाग