मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  viral news : काय सांगता! जमीन हडपण्यासाठी चक्क मृत व्यक्तीशी लावले लग्न; आरोपी गजाआड

viral news : काय सांगता! जमीन हडपण्यासाठी चक्क मृत व्यक्तीशी लावले लग्न; आरोपी गजाआड

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 17, 2024 09:49 AM IST

agra crime viral news : २००९ मध्ये मृत झालेल्या एका व्यक्तीचे खोट्या कागद पत्रांच्या आधारे लग्न दाखवून जमीन हडपणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार आग्रा येथे उघडकीस आला आहे.

जमीन हडपण्यासाठी चक्क मृतदेहाचे लावले लग्न
जमीन हडपण्यासाठी चक्क मृतदेहाचे लावले लग्न

agra crime viral news : २००९ मध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असतांनाही २०२१ मध्ये, कागदपत्रांमध्ये घोळ करून पुन्हा या व्यक्तीचे लग्न आणि मृत्यू झाला असल्याचा प्रकार काही भामट्यांनी दाखवला. या भामट्यांनी मृत व्यक्तीला तब्बल १२ वर्षे जिवंत दाखवले. या काळात त्याचे लग्नही लावले. या हेरफेरीतून मोठा भूखंड या भामट्यांनी लाटल्याचे तपासात पुढे आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी हा प्रकार मनपा कर्मचाऱ्यांचा संगनमताने केला. मृत व्यक्तीच्या मुलाने वडिलांच्या मृत्यूशी संबंधित कागदपत्रे दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

Loksabha Election 2024: पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच होणार दोन टप्यात मतदान; महायुती महाविकास आघाडीत चुरशीचा सामना

आग्रा जवळील बोदला येथील १० हजार चौरस यार्ड जागेच्या खरेदी विक्री प्रकारणाला आता नवे वळण मिळाले आहे. ही जमीन हडप करण्यासाठी उमा देवी हिने जसबीर सिंग असे आपले नाव बदलले. मात्र, जसबीर सिंग यांचे २२ डिसेंबर २००९ रोजी निधन झाले. त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र २६ डिसेंबर २००९ रोजी जारी करण्यात आले. आरोपींनी जसबीर सिंगचे खोट्या कागद पत्रांच्या आधारे नवे मृत्यू प्रमाणपत्र तयार केले. यात त्याचा मृत्यू ऑक्टोबर २०२१ मध्ये झाल्याचे दाखवले. जसबीर यांचा मुलगा सतविंदर सिंग उर्फ ​​मती याने २००९ मध्ये वडिलांच्या मृत्यू झाला असल्याचे सांगितले. तसेच त्याची कागदपत्रे देखील सादर केल्यावर या प्रकरणाला वाचा फुटली.

मतदार यादीत नसल्यास मतदानाच्या हक्काला मुकाल! लगेचच ऑनलाइन तपासा, ही आहे पद्धत; वाचा

जसबीर सिंग यांचा मुलगा माटी आई गुरमीत कौर आणि पत्नीसोबत दिल्लीत राहतो. कुरिअर कंपनीत काम करणाऱ्या माटीने सांगितले की, तो शास्त्रीपुरम येथील निखिल उद्यानात राहत होता. येथेच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांचे आवास विकास कॉलनीतही दुकान होते. दुकानाच्या वर एक खोलीही बांधली होती. वडिलांचे निधन झाल्यावर ते २०१० मध्ये आग्राहून दिल्लीत आले. या काळात काय घडले? त्यांना याची माहिती नव्हती.

माटी यांनी सांगितले की त्यांना सोशल मीडियावर एक बातमी दिसली. ही बातमी वाचून त्यांना धक्का बसला. त्यांच्या वडिलांच्या नावावर जमिनीची फसवणूक जायचे त्यांना कळले. त्यांच्या वडिलांचा मृत्यू २००९ मध्येच झाला होता. मात्र, जमिनीसाठी खोट्या कागदपत्रांद्वारे त्यांचा मृत्यू २०२१ मध्ये झाल्याचे दाखवण्यात आले, ही बाब त्याने लुधियाना येथे राहणारा त्याचा चुलत भाऊ जगदेव सिंगला दिली.

यानंतर माटीने अंत्यसंस्काराशी संबंधित सर्व कागदपत्रे पोलिसांना दिली. त्याचे वडील जसबीर यांच्या निधनानंतरची कागदपत्रे पुढे आल्यावर या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश झाला

IPL_Entry_Point

विभाग