मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चीन, पाकिस्तानला भरणार धडकी! क्षेपणास्त्र डागण्यात माहिर असलेला पहिला स्वदेशी लाईटवेट टँक 'जोरावर' तयार

चीन, पाकिस्तानला भरणार धडकी! क्षेपणास्त्र डागण्यात माहिर असलेला पहिला स्वदेशी लाईटवेट टँक 'जोरावर' तयार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 13, 2024 09:35 AM IST

Indian Light Tank Zorawar : डीआरडीओने पहिला स्वदेशी लाइट हलका रणगाडा तयार केला आहे. हा रणगाडा अतिशय वेगवान आणि घातक असून शत्रूच्या ठिकाणांचा नायनाट करण्यास सक्षम आहे. या रनगाड्याचे नाव 'जोरावर' ठेवण्यात आले असून याच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

Light Tank Zorawar
Light Tank Zorawar

Light Tank Zorawar : भारत चीन संघर्षानंतर भारतीय लष्कराला डोंगराळ प्रदेशात वेगाने हालचाल करणारा रणगाड्याची गरज भासली होती. या प्रकारचे रणगाडे रशिया कडून खरेदी करण्याचा भारताचा मानस होता. मात्र, डीआरडीओने ही जबाबदारी सांभाळत दोन वर्षात डोंगराळ प्रदेशात वेगाने हालचाली करून शत्रूचा नायनाट करण्यास सक्षम असलेल्या 'जोरावर' हा स्वदेशी हलका लढाऊ टॅंक तयार केला आहे. याचा चाचण्या सुरू करण्यात आल्या असून यूजर ट्रायल्सही एप्रिलपर्यंत सुरू करण्याचा डीआरडीओचा मानस आहे. भारतीय लष्कर देखील याच्या चाचण्या घेणार आहेत.

DRDO आणि लार्सन अँड टुब्रो (L-&T)ने मिळून हा नवा रणगाडा तयार केला आहे. या रणगाड्याच्या चाचण्या वाळवंट आणि उंचावरील ठिकाणी करून डिसेंबरपर्यंत भारतीय लष्कराला हा रणगाडा सुपूर्द करण्यात येणार होता, मात्र जर्मनीकडून इंजिन पुरवठा होण्यास विलंब झाल्याने याला विलंब झाला.

डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्वदेशी हलक्या लढाऊ रणगाड्यात इंजिन बसवण्यात आले आहे. या रणगाडा १०० किलोमीटरपर्यंत चालवून पाहण्यात आलेला आहे. भारतीय लष्करानं डीआरडीओला ५९ जोरावर रणगाडे बनवण्याची ऑर्डर दिली होती. या रणगाड्याचे प्रारूप आणि डिझाईन डीआरडीओने तयार केले आहे. भारतीय लष्कराला २५९ हलके रणगाडे हवे आहेत.

Ram Mandir Inauguration: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याचे निमंत्रण

काय आहे प्रोजेक्ट जोरावर?

भारतीय लष्कराला लडाख सारख्या उंच भागात शत्रूशी दोन हात करण्यासाठी ३५४ हलक्या रणगाड्यांची आवश्यकता आहे. यापैकी L&T आणि DRDO हे ५९ रणगाडे तयार करणार आहेत. तर उर्वरित रणगाडे तयार करण्यासाठी भारतीय कंपन्यांना कंत्राट दिले जाणार आहेत. हा रणगाडा AI इंटिग्रेटेड, ड्रोन युद्ध क्षमता आणि सक्रिय संरक्षण प्रणाली यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आला आहे.

हा रणगाडा २५ टन वजनाचा आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर द्वारे देखील हा रणगाडा सीमेवर काही वेळेत तैनात करता येणार आहे. या रणगाड्यात १२० किमी प्रतीतास वेगाने धावू शकतो. यात स्वयंचलित लोडर गण देण्यात आली आहे. एक रिमोट वेपन स्टेशन असून यात १२.७ एमएम हेव्ही मशीन गन देखील लावली जाणार आहे. या सोबतच जोरावरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन इंटिग्रेशन, ऍक्टिव्ह प्रोटेक्शन सिस्टीम, हाय डिग्री ऑफ सिच्युएशनल तसेच क्षेपणास्त्र डागण्याची क्षमते सोबतच शत्रूचं ड्रोन शोधण्यासाठी आणि ते पाडण्यासाठी यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

जोरावर नाव का दिले?

जोरावरला पंजाबी भाषेत बहादूर असे संबोधले जाते. चीन-शीख युद्धादरम्यान कैलास-मानसरोवरवर लष्करी मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या जनरल जोरावर सिंह कहलुरिया यांच्या नावावरून या रणगाड्याला जोरावर हे नाव देण्यात आले आहे. हे एक आर्मर्ड फायटिंग व्हेइकल आहे. शत्रूनं कोणत्याही शस्त्रानं हल्ला केला, तरीदेखील या रणगाड्यामध्ये असलेले जवान सुरक्षीत राहतली, असा दावा डीआरडीओनं केला आहे. या रणगाड्याच्या मारक क्षमतेबाबत बोलायचं झालं तर, हा सर्वात वेगानं पुढे जाऊ शकतो.

WhatsApp channel