Indian Army news : लष्करप्रमुख (COAS) जनरल मनोज पांडे यांना लष्कर प्रमुख पदाचा कार्यकाळ एका महिन्याने वाढवण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने आज लष्करप्रमुखांच्या सेवेच्या मुदतवाढीला मंजुरी दिली. अहवालानुसार, पांडे यांची सेवानिवृत्तीची तारीख ३१ मे २०२४ होती, ती एक महिन्याने म्हणजेच ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. मनोज पांडे यांची ३० एप्रिल २०२२ रोजी भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
वृत्तानुसार, रविवारी संरक्षण मंत्रालयाने यासंबंधीचे निवेदन जारी केले. जनरल मनोज पांडे ३१ मे रोजी निवृत्त होणार होते. मात्र आता ते ३० जून रोजी निवृत्त होणार असल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने लष्करी नियम १९५४ च्या नियम १६ ए (४) अन्वये हा निर्णय घेतला आहे. जनरल पांडे हे डिसेंबर १९८२ मध्ये लष्कराच्या इंजिनिअर कॉर्प्समध्ये कमिशन होत त्यांनी त्यांच्या लष्करी कार्यकिर्दीला सुरुवात केली होती. लष्करप्रमुख होण्यापूर्वी ते लष्कर उपप्रमुख होते.
वन रँक, वन पेन्शनबाबत पंतप्रधान मोदी यांनी मोठी घोषणा केली होती. तसेच भारतीय लष्करापुढील आव्हान देखील मोठे होते. त्यावर देखील पीएम मोदी यांनी मोठे भाष्य केले होते. दरम्यान जनरल मनोज पांडे यांच्यावर या बाबत मोठी जबाबदारी देण्यात आली होती. मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसने\ भारतीय लष्कराच्या शूर जवानांना 'वन रँक, वन पेन्शन'ही मिळू दिले नाही, अशी टीकाही मोदी यांनी केली होती.
मोदी आले तेव्हा लष्करातील जवानांसाठी 'वन रँक, वन पेन्शन' लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी शनिवारी गाझीपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित करत होते. गाझीपूर ही सैनिकांची भूमी असल्याचे सांगून मोदी म्हणाले, 'गाझीपूरची भूमी शौर्य आणि शौर्याच्या अनेक कटहा सांगते. गाझीपूर आणि इथल्या गमहर गावाची परंपरा देशासाठी प्रेरणादाई आहे. या गावात प्रत्येक घरात शूर माणसं तयार होतात. गाझीपूरशिवाय हे वैभव कुणाला मिळालेलं नाही. मी आणि संपूर्ण देश या मातीचा ऋणी आहे.
संबंधित बातम्या