उत्तर प्रदेशातील आग्रा येथे हवाई दलाच्या विमानाचा मोठा अपघात झाला आहे. मिग २९ हे लढाऊ विमान शेतात कोसळलं आणि विमानाला आग लागली. पायलटसह दोघांनी प्रसंगावधान राखून उडी मारल्याने ते या दुर्घटनेतून बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमानापासून जवळपास दोन किलोमीटरवर पायलट आणि त्याचा सहकारी आढळून आला.
मिग-२९ विमानाला आग लागून शेतात क्रॅश लँडिंग झाले आहे. विमान रहिवासी भागात पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. लँडिंगपूर्वी विमानाच्या पायलटने उडी मारून आपला जीव वाचवला. कागरोळमधील सोंगा गावाजवळ ही घटना घडली. घटनास्थळी मोठी गर्दी जमली आहे. वरिष्ठ अधिकारीही दाखल झाले आहेत. पायलटला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सध्या अधिकाऱ्यांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. विमानाला आग कशाने लागली हे अद्याप समोर आलेले नाही.
अपघातग्रस्त विमानाने पंजाबमधील आदमपूर येथून नियमित सरावासाठी उड्डाण केले होते. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाने एक्सवर सांगितले आहे की, मिग-२९ बाडमेरमध्ये नियमित रात्रीच्या प्रशिक्षणासाठी गेले होते. यावेळी तांत्रिक बिघाड झाला. विमान कोसळण्याआधीच पायलटने विमान कोसळताच त्यातून उडी मारली. पायलट सुरक्षित आहे.
लोकांच्या माहितीनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. आग विझवण्यापर्यंत विमानात नियमित स्फोट होत होते. यामुळे लोक विमानाजवळ जाण्यास घाबरत होते. काही लोक अगदी जवळ पोहोचले होते पण स्फोटाच्या आवाजाने ते मागे हटले. विमानाचे काही भागही शेतात विखरून पडले होते.
हा अपघात कसा घडला याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. काही तांत्रिक बिघाड होता का? यामागे आणखी कोणते कारण होते का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विमान पंजाबच्या आदमपूर येथून आग्राकडे जात होते. त्याचवेळी ही घटना घडली.
हे विमान आग्र्याजवळच्या शेतात कोसळलं. रहिवासी वस्तीपासून दूर अंतरावर हे विमान कोसळलं. जर रहिवासी परिसरात विमान कोसळलं असतं तर मोठा अनर्थ घटला असता. शेतात कोसळल्यानंतर विमानाने पेट घेतला. मिग २९ हे लढाऊ विमान अनेक वर्षांपासून हवाई दलाच्या सेवेत आहे.