मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Cheetah Crash : भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर अरुणाचलमध्ये कोसळलं! बेपत्ता वैमानिकांचा शोध सुरू
Cheetah crash
Cheetah crash

Cheetah Crash : भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर अरुणाचलमध्ये कोसळलं! बेपत्ता वैमानिकांचा शोध सुरू

16 March 2023, 15:03 ISTGanesh Pandurang Kadam

Cheetah helicopter crashes in Arunachal Pradesh : भारतीय लष्कराचं 'चिता' हे हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशात कोसळल्याची माहिती आहे.

Cheetah helicopter crashes in Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशातील मंडला हिल्स परिसरात भारतीय लष्कराचं ‘चित्ता’ हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या अपघातानंतर हेलिकॉप्टरमधील दोन वैमानिक बेपत्ता असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९.१५ वाजता हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. तेव्हापासून हेलिकॉप्टरचा शोध सुरू आहे. बोमडिलाच्या पश्चिमेकडील मंडाला हिल्स इथं हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं प्राथमिक माहिती आहे. हेलिकॉप्टर व वैमानिकांचा शोध सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी दिली.

लेफ्टनंट कर्नला व्ही. व्ही. रेड्डी आणि मेजर जयंत हे या हेलिकॉप्टरचे वैमानिक आहेत. हेलिकॉप्टरचे जळालेले अवशेष सापडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप वैमानिक सापडले नसल्यानं ते सुखरूप असावेत, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

विभाग