Army Agniveer Result 2024 : लष्कराच्या अग्निवीर परीक्षेचा निकाल जाहीर; 'या' वेबसाईट पाहाता येणार निकाल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Army Agniveer Result 2024 : लष्कराच्या अग्निवीर परीक्षेचा निकाल जाहीर; 'या' वेबसाईट पाहाता येणार निकाल

Army Agniveer Result 2024 : लष्कराच्या अग्निवीर परीक्षेचा निकाल जाहीर; 'या' वेबसाईट पाहाता येणार निकाल

May 29, 2024 12:21 PM IST

Army Agniveer Result 2024 : लष्करा मार्फत घेण्यात आलेल्या अग्निवीर परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. लष्कराच्या joinindianarmy.nic.in वर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

लष्करा मार्फत घेण्यात आलेल्या अग्निवीर परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
लष्करा मार्फत घेण्यात आलेल्या अग्निवीर परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

Army Agniveer Result 2024 Direct Link : लष्कराच्या अग्निवीर भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल लष्कराच्या Joinindianarmy.nic.in वर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना त्यांचा निकाल या संकेत स्थळवर पाहता येणार आहे. भारतीय लष्कराने अग्निवीर भरती योजने अंतर्गत भरती प्रक्रिया राबवली होती. या साठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसर वाईज सीईईचा निकाल जॉइन इंडियन आर्मी वेबसाइटवर प्रसिद्ध झाला आहे. उमेदवार त्यांच्या झोन आणि पोस्टच्या लिंकवर क्लिक करून त्यांचा निकाल पाहू शकणार आहेत.

१ जूनपासून बदलणार आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्सशी संबधित 'हे' नियम, LPG सिलिंडरच्या दरातही होणार बदल

यशस्वी उमेदवारांचे रोल नंबर पीडीएफ फाइलमध्ये दिले आहेत. सध्या, अग्निवीर GD, अग्निवीर टेक, अग्निवीर ट्रेड्समन, अग्निवीर ऑफिस असिस्टंट आणि नर्सिंग असिस्टंट या पदांसाठी जयपूर, अलवर, जोधपूर, झुंझुनू, राजस्थानचे कोटा आणि एमपीचे जबलपूर भोपाळ, रायपूर ARO यासह विविध ARO अंतर्गत जाहीर करण्यात आले आहेत. हळुहळू इतर राज्यांतील एआरओ पदांचे निकालही या दिवसांत जाहीर होतील.

अग्निवीर जीडी परीक्षा २२, २३, २४, २५ आणि २९ एप्रिल रोजी झाली. यानंतर अग्निवीर जनरल ड्युटी वुमन एमपी, अग्निवीर टेक, अग्निवीर ट्रेडसमन ८ वी आणि १० वी ची परीक्षा ३० एप्रिल रोजी घेण्यात आली होती. अग्निवीर कार्यालय सहाय्यक पदासाठी ३ मे २०२४ रोजी परीक्षा घेण्यात आली होती.

Mumbai Local News : पालघरजवळ मालगाडी घसरल्यामुळं ठप्प झालेली डहाणू-विरार लोकल सेवा अजूनही सुरू नाही! नोकरदारांचे हाल

अग्निवीर परीक्षेचा निकाल असा पाहा

- इंडियन आर्मी अग्निवीर निकाल २०२४चा निकाल joinindianarmy.nic.in या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

- या लिंकवर जाऊन कॅप्चा कोड काळजीपूर्वक टाकून वेबसाइट उघडा.

- मुख्यपृष्ठावर दिलेल्या CEE निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

- तुम्हाला सर्व ARO रॅलीच्या निकालांच्या लिंक्स सादर केल्या जातील.

- तुमच्या ARO च्या लिंकवर क्लिक करा आणि यशस्वी उमेदवारांची PDF फाइल उघडल्यावर तुमचा रोल नंबर शोधा.

Army Agniveer result 2024: CCE written results for Jodhpur ARO

Jaipur ARO Agniveer written results 2024

Army Agniveer Result 2024: Jhunjhunu ARO written exam results

Army Agniveer Result 2024: Kota ARO CCE results

Army Agniveer Result 2024: Alwar ARO written results

निवड कशी होणार?

आता लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्यांची शारीरिक चाचणी होणार आहे. शारीरिक चाचणीबद्दल सांगायचे तर, ग्रुप-१ अंतर्गत तुम्हाला साडेपाच मिनिटांत १.६ किमी धावावे लागणार आहे. यासाठी ६० गुण दिले जातील. १० पुल अप करावे लागतील जे ४० गुणांचे असतील.

- ग्रुप-२ अंतर्गत तुम्हाला ५ मिनिटे ४५ सेकंदात १.६ किमी धावावे लागणार आहे. ९ पुल अप्स काढावे लागणार आहेत. ज्यासाठी ३३ गुण असतील.

- ९ फूट लांब उडी मारावी लागेल. पात्र परीक्षेसाठी या बाबी गरजेच्या आहेत.

- फक्त जिग जैंग बॅलेन्स चाचणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रियेतील टप्पे

पहिला टप्पा ऑनलाइन सामायिक लेखी परीक्षा

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर