lashkar terrorist dies in pakistan : भारतीय गुप्तचर यंत्रणेने पाकिस्तानमध्ये लष्करचे ए तैयबाच्या (lashkar e taiba terroris) दहशतवाद्यांना ठार मारल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. दरम्यान, भारताने हे आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. दोन्ही देशांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या सुरू असतानाच लष्कर या दहशतवादी संघटनेच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख आझम चीमा यांचा पाकिस्तानातील फैसलाबाद येथे संशयास्पद मृत्यू झाला. चिमाचे वय ७० वर्षे होते.
चीमा २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा आणि जुलै २००६ च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट तसेच भारतातील इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांतिल मुख्य सूत्रधार होता. चीमा यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच भारतीय यंत्रणांच्या दाव्याला बळ मिळाले असून त्यात पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी लपले असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मात्र, पाकिस्तानने पुन्हा आपली नकार घंटा सुरूच ठेवली आहे.
गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीमा पंजाबी बोलत होता. तो लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी होता. त्याने २००० च्या दशकाच्या सुरुवातीला पाकिस्तानातील बहावलपूर येथे पत्नी व दोन मुलांसह राहत होता.
एका सूत्राने सांगितले की, "तो अनेकदा सहा अंगरक्षकांसह लँड क्रूझरमध्ये पाकिस्तानमध्ये फिरताना दिसत होता." चीमा यांनीच एकेकाळी आयएसआयचे माजी प्रमुख जनरल हमीद गुल, ब्रिगेडियर रियाझ आणि कर्नल रफिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. चिमा हा कधी कधी कराचीला तर कधी लाहोरला दहशतवाद्यांना प्रशिक्षण द्यायसाठी जात होता.
चीमाला अफगाण युद्धाचा अनुभव असून नकाशे वाचण्यात तो तरबेज होता, विशेषतः भारताचा नकाशा वाचण्यात तो निष्णात होता. सूत्राने सांगितले की, "त्याने जिहादींना नकाशांवर भारतातील महत्त्वाची प्रतिष्ठाने शोधण्यास शिकवले. २००० च्या दशकाच्या मध्यात सॅटेलाइट फोनद्वारे भारतभरातील एलईटीच्या दहशतवाद्यांना देखील त्याने प्रशिक्षण दिल्याचे पुढे आले आहे.
चीमा २००८ मध्ये पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये एलईटी कमांडर म्हणून काम करत होता. यावेळी त्यांची लष्कराचे वरिष्ठ अधिकारी झकी-उर-रहमान लखवी यांचे ऑपरेशनल सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यूएस ट्रेझरी डिपार्टमेंटने त्याचे वर्णन लष्कर-ए-तैयबाच्या ऑपरेशन्समधील प्रमुख कमांडर म्हणून केले आहे. तो ओसामा बिन लादेनच्या अल-कायदा नेटवर्कशी जोडला गेला होता.
संबंधित बातम्या