मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mohan Bhagwat: 'फक्त खाणं आणि लोकसंख्या वाढवणं हे काम तर जनावरंही करतात'
RSS Chief Mohan Bhagwat
RSS Chief Mohan Bhagwat (HT)

Mohan Bhagwat: 'फक्त खाणं आणि लोकसंख्या वाढवणं हे काम तर जनावरंही करतात'

14 July 2022, 10:23 ISTAtik Sikandar Shaikh

RSS Chief Mohan Bhagwat on Population: गेल्या काही दिवसांपासून देशात लोकसंख्यावाढीच्या मुद्द्यावरून राजकीय वाद पेटला आहे. याआधी मुख्यमंत्री योगी आणि मुख्तार अब्बास नक्वी यांच्यातील वादानंतर आता त्यावर मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

RSS Chief Mohan Bhagwat On Population Growth : सध्या देशभरात लोकसंख्यावाढीवरून राजकीय वाद पेटला असताना त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी टिप्पणी केली आहे. 'व्यक्तीचं केवळ जिवंत राहणं हा उद्देश असून नये, फक्त खाणं आणि लोकसंख्या वाढवण्याचं काम तर जनावरंही करतात, शक्तिशाली व्यक्तीच जिवंत राहू शकतो, हा जंगलाचा नियम आहे, दुसऱ्यांचं रक्षण करणं हेच मनुष्य असल्याचं लक्षण असल्याचं' मोहन भागवत म्हणाले. कर्नाटकातील श्री सत्य साई यूनिवर्सिटी फॉर ह्यूमन एक्सलन्सच्या पहिल्या दिक्षांत सोहळ्यात भागवत बोलत होते.

ट्रेंडिंग न्यूज

मनुष्य असण्याचे काही कर्तव्य आहेत...

कर्नाटकातील या कार्यक्रमात बोलताना आरएसएस प्रमुख भागवत यांनी धर्मपरिर्तनाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं, तसेच लोकसंख्यावाढीवरही मत व्यक्त केलं आहे. 'मनुष्य असल्याचे आपले काही कर्तव्य आहेत, त्याला वेळोवेळी निभावणं गरजेचं आहे, फक्त खाणं आणि लोकसंख्या वाढवण्याचं काम तर जनावरंही करतात', असं ते म्हणाले.

विज्ञानापेक्षा अध्यात्म मोठं....

१८५७ नंतर स्वामी विवेकानंदांनी देशाला अध्यात्माच्या बाबतीत पुढं नेलं. त्यामुळं अध्यात्माच्या माध्यमातूनच श्रेष्ठता मिळवता येऊ शकते. विज्ञान अजून सृष्टीच्या स्त्रोताला समजू शकलेलं नाही. गेल्या काही वर्षांपासून भूतकाळातील चुकांतून शिकत आणि भविष्यातील गोष्टींचा विचार करत देशानं चांगली प्रगती केली आहे. जर मी हे १० ते १२ वर्षांपुर्वी बोललो असतो, तर कुणी मनावरही घेतलं नसतं. असंही ते म्हणाले.

त्याचबरोबर कार्यक्रमात बोलताना त्यांनी सर्वांशी प्रेम करण्याचा व सेवा करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय धर्म, भाषा किंवा देशांचे वेगळे वाद आहेत. परंतु पर्यावरण आणि विकासामध्ये नेहमी वादाची स्थिती राहिलेली आहे. मागच्या एक हजार वर्षात अशाच पद्धतीनं जग विकसित झाल्याचं भागवत यांनी सांगितलं.

कर्नाटकातील श्री सत्य साई यूनिवर्सिटी फॉर ह्यूमन एक्सलन्सच्या पहिल्या दिक्षांत सोहळ्यासाठी इस्त्रोचे माजी अध्यक्ष के कस्तूरीरंगन, भारताच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सुनील गावस्कर, गायक पंडित एम वेंकटेश कुमार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग