तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर! मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा खळबळजनक आरोप-animal fat used in tirupati laddoos cm chandrababu naidu blame to ysr congress ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर! मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा खळबळजनक आरोप

तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर! मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा खळबळजनक आरोप

Sep 19, 2024 08:17 AM IST

Chandrababu Naidu On Tirupati Temple : वायएसआर काँग्रेसच्या काळात तिरुपतीमध्ये प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला.

तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर! मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा खळबळजनक आरोप
तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर! मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा खळबळजनक आरोप

Chandrababu Naidu On Tirupati Temple : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी खळबळजनक आरोप केला. त्यांनी मागील वायएसआर काँग्रेसवरच्या राजवटीत तिरुपतीमध्ये प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याचं म्हटलं आहे. लाडू तयार करतांना शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली, असा आरोप चंद्राबाबू यांनी केला आहे. वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने हा आरोप दुर्भावनापूर्ण असल्याचं म्हणत नाकारला आहे. यामुळे आंध्र प्रदेशमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. कारण तिरुमला तिरुपती देवस्थानाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व चंद्राबाबू नायडू यांचे कट्टर विरोधक जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या वतीनं भक्तांना देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप खुद्द मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केल्याने मोठा गदारोळ माजला आहे. नायडूंच्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे.

बुधवारी एनडीए विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत संबोधित करताना चंद्राबाबू नायडू म्हणाले की, जगन रेड्डी सरकारच्या काळात तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू बनवण्यासाठी शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होती. मंदिराचे व्यवस्थापन 'तिरुमला' तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे केले जाते. नायडूंचा तेलुगू देसम पक्ष जूनमध्ये पवन कल्याण यांच्या जनसेना आणि भाजपसोबत युती करून आंध्र प्रदेशमध्ये सत्तेवर आले आहेत.

काय म्हणाले चंद्राबाबू ?

चंद्राबाबू नायडू म्हणाले, गेल्या ५ वर्षांत, आयएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाचे पावित्र्य कलंकित केले आहे. त्यांनी 'अन्नदानम' (मोफत अन्न) च्या गुणवत्तेशी तडजोड केली असून प्रसादाच्या लाडूत तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरून पवित्र तिरुमलाचे पावित्र्य भंग केले. या प्रकरणामुळे चिंता वाढली आहे, तथापि, आमचे सरकार येथील शुद्धतेचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचं चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.

वायएसआरने दिले चोख उत्तर

दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणात वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी नायडूंवर तिरुपती मंदिराच्या पावित्र्याला हानी पोहोचवल्याचा आरोपांचे खंडन केले आहे. या बाबबत रेड्डी यांनी लिहिले आहे की, "राजकीय फायद्यासाठी चंद्राबाबू नायडू कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. भक्तांचा विश्वास दृढ करण्यासाठी मी माझ्या कुटुंबासह तिरुमला 'प्रसाद' खाणार आहे. तिरुमला प्रसाद यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या टिप्पण्या अत्यंत दुर्दैवी आहेत. कोणीही असे शब्द बोलू नये किंवा आरोप करू नये, असे रेड्डी यांनी एक्सवर लिहिले आहे.

Whats_app_banner
विभाग