मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खळबळजनक! मुलीच्या आत्महत्येमुळं संतापलेल्या नातेवाइकांनी सासू-सासऱ्यांना जिवंत जाळलं; व्हिडिओ व्हायरल

खळबळजनक! मुलीच्या आत्महत्येमुळं संतापलेल्या नातेवाइकांनी सासू-सासऱ्यांना जिवंत जाळलं; व्हिडिओ व्हायरल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 19, 2024 02:19 PM IST

Prayagraj News : प्रयागराज येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहितेने आत्महत्या केल्याने तिच्या संतप्त झालेल्या नातेवाइकांनी मुलाचे घर पेटवून देत सासू सासऱ्यांना जीवंत जाळले.

प्रयागराज येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहितेने आत्महत्या केल्याने तिच्या संतप्त झालेल्या नातेवाइकांनी मुलाचे घर पेटवून देत सासू सासऱ्यांना जीवंत जाळले.
प्रयागराज येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहितेने आत्महत्या केल्याने तिच्या संतप्त झालेल्या नातेवाइकांनी मुलाचे घर पेटवून देत सासू सासऱ्यांना जीवंत जाळले.

Prayagraj News : प्रयागराजमध्ये लग्नाच्या अवघ्या वर्षभरातच मुलीने सासरच्या घरी आत्महत्या केल्याने तिच्या संतत्प नातेवाइकांनी मुलीच्या सासरचे घर पेटवून दिले. पोलिसांनी कसेबसे पाच जणांना आगीतून वाचवले मात्र सासू व सासरे यांचा जळून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुठीगंज पोलीस ठाण्यालगत घडली. येथे राहणारे फर्निचर व्यावसायिक अंशू केसरवानी यांची पत्नी अंशिका केसरवानी हिने सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मुलीच्या नातेवाईक आणि पालकांना मिळताच पालक घटनास्थळी पोहोचले. मुलीच्या मृत्यूमुळे नतेवाईक चांगलेच संतत्प झाले. त्यांनी रात्रीच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी अंशिकाचा मृतदेह रस्त्यावर ठेवून संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी रागाच्या भरात अंशूच्या फर्निचरच्या दुकाना आग लावली. तसेच त्याच्या घरालाही आग लावली. यामुळे त्याच्या कुटुंब घरातच अडकले. घराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना पोलिसांनी बाहेर काढले. रात्री दीड वाजेपर्यंत तिसऱ्या मजल्यावरील आग पूर्णपणे विझली नव्हती. पोलिसांनी बचावकार्य करून पाच जणांचे प्राण वाचवले. मात्र, घरात अडकलेल्या अंशिकाचे सासू-सासरे बाहेर येऊ शकले नाहीत. त्यांच्या या आगीत जळून मृत्यू झाला. दरम्यान, आग विझवल्यावर घरात शोध मोहीम राबवल्यास सासू सासऱ्यांचे मृतदेह घरात आढळून आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. सध्या या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण आहे. पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

Narendra Modi : अब की बार ४०० पार.. इतक्या जागा कशाला हव्यात?, पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं

धूमनगंज येथील सरदारी लाल यांची मुलगी अंशिका (वय २६) हिचा विवाह मुथीगंज येथील अंशू केसरवानी यांच्याशी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला होता. लग्नाच्या दिवशी अंशूने नाराजी व्यक्त केली होती. या वरुन सासरचे लोक अंशिकावर अत्याचार करत होते. हा त्रास सहन न झाल्याने सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अंशिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब तिच्या कुटुंबीयांना मिळाली. यानंतर कुटुंबीय, नातेवाईक आणि स्थानिक लोक मुठीगंजमध्ये पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी मुलीचा खून केल्याचा आरोप केला. यानंतर अंशिकाचा मृतदेह घराबाहेर काढून रस्त्यावर ठेवला आणि कारवाईची मागणी सुरू केली. दरम्यान, अंशूच्या कुटुंबीयांना घरातच जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आधी त्यांच्या कानाला आग लावण्यात आली. फर्निचरचे दुकान असल्याने आगीने त्वरित पेट घेत भीषण रूप धरण केले. यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्यांना शांत केले. गोंधळ सुरू होताच पती पळून गेला, सासू, सासरे आणि वहिनी घरात अडकले होते.

शिक्षकांसमोर विद्यार्थिनीचे कपडे काढून घेतली झडती, घरी जाऊन मुलीची आत्महत्या

मुठीगंज पोलीस ठाण्याला लागूनच अंशू मुलगा पप्पू केसरवानी याचे तीन मजली घर आहे. घराच्या खालच्या भागात फर्निचरचे दुकान आहे. तर वरच्या दोन मजल्यावर तो त्याचे आई-वडील आणि लहान बहिणीसोबत राहत होता. पत्नी अंशिकाने गळफास लावून घेतल्यानंतर पालकांनी गोंधळ घातला तेव्हा अंशूने मागून पळ काढला. यादरम्यान मुलीच्या नातेवाइकांनी घराला आग लावली. आई-वडील आणि लहान बहीण वरच्या मजल्यावर गेल्याचे सांगितले जात आहे. पोलिस आले तेव्हा मोठा गोंधळ सुरू होता. आग वाढल्याने पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. दरम्यान, मोठा जनसमुदाय जमला होता. एकीकडे पोलिस जमावाला शांत करत होते. तर त्यांनी दुसरीकडे बचाव मोहीमही राबवली. अग्निशमन दल येण्यापूर्वीच पोलिसांच्या पथकाने बचावकार्य सुरू केले होते. पोलिसांनी दुकानाचे शटर तोडले. त्यामुळे विषारी धूर वरच्या दिशेने पसरण्याचा धोका कमी झाला. यानंतर पोलिसांनी वर जाऊन एक एक करून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. पण सासू-सासरे यांना वाचवता आले नाही. शोध मोहिमेदरम्यान दोघांचेही मृतदेह सापडले.

पोलिस आयुक्त रमित शर्मा रात्री उशिरा घटनास्थळी आले. घराच्या तिसऱ्या मजल्यावर लोक अडकल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी शोधमोहीम राबवली. पोलिसांनी सांगितले की, रात्री २ वाजेपर्यंत घराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर सर्व काही ठीक होते. तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. तिथे धूर होता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आत जाणे कठीण झाले होते.

IPL_Entry_Point