माहूत वारंवार मारत होता छडी, चिडलेल्या हत्तीने पायाखाली तुडवून मारलं, पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  माहूत वारंवार मारत होता छडी, चिडलेल्या हत्तीने पायाखाली तुडवून मारलं, पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

माहूत वारंवार मारत होता छडी, चिडलेल्या हत्तीने पायाखाली तुडवून मारलं, पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

Jun 24, 2024 04:49 PM IST

Elephant Video : केरळमधीलइडुक्की येथे एका सफारी सेंटरमध्ये पिसाळलेल्या हत्तीने आपल्याच माहुताला पायाखाली चिरडून ठार मारलं आहे. मृत्यूचा हा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 चिडलेल्या हत्तीने माहुताला पायाखाली तडवून मारलं
चिडलेल्या हत्तीने माहुताला पायाखाली तडवून मारलं

हत्ती एक समजूतदार, शांत तसेच हुशार प्राणी आहे. हत्ती व माणसांच्या मित्रत्वाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. मात्र जेव्हा एखाद्या जनावराला जबरदस्तीने छेडले तर त्याचे परिणाम खूपच भयंकर होतात. असाच प्रकार एका ६२ वर्षीय वृद्ध व्यक्तीसोबत घडला आहे. माहूत असलेला हा व्यक्ती हत्तीला छडीने मारत होता, यामुळे चिडलेल्या हत्तीने या व्यक्तीला चिरडून मारले.
 

केरळमधील इडुक्की येथे एका सफारी सेंटरमध्ये पिसाळलेल्या हत्तीने आपल्याच माहुताला पायाखाली चिरडून ठार मारलं आहे. हा माहूत हत्तीच्या पायावर वारंवार काठीने मारत होता, यामुळे हे शांत मानले जाणारे जनावर चिडले. त्यानंतर हत्तीने पायाने धक्का देत त्याची कंबर मोडली. त्यानंतर त्यांच्या पाठीवर पाय देत चिरडले. त्यानंतरही हत्तीचा राग शांत झाला नाही. तो माहुताला तुडवू लागला तसेच त्याला उचलून आपटू लागला. काही काळानंतर दुसऱ्या माहुताने त्याला कसेतरी नियंत्रणात आणले व लोकांची माहूताचा मृतदेह बाहेर काढला.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इडुक्की शहरात जेथे माहुताचा मृत्यू झाला तेथील सफारी सेंटर अवैधरित्या चालवले जात होते. सफारीचे संचालन करणाऱ्यांनी याची नोंदणी भारतीय पशु कल्याण बोर्डाकडे केली नव्हती. या प्रकरणात वन विभागाने सफारी सेंटरला स्टॉप मेमो जारी करत बंद केले आहे.

पिसाळलेल्या हत्तीने माहुताला जमिनीवर आपटलं –

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,हत्तीच्या रागाचा शिकार झालेल्या माहुताचे नाव बालकृष्णन (वय ६२) होते. मृत व्यक्ती गेल्या अनेक वर्षापासून कल्लरमध्ये एका खासगी हत्ती सफारी केंद्रात काम करत होता. गुरुवारी (२० जून) सायंकाळी सहा वाजता ते पर्यटकांना फिरवण्यासाठी हत्तीला तयार करत होते. ते हत्तीला आपल्या जागेवर उभे राहण्यासाठी त्याला छडी मारत होते. हत्ती काही वेळ त्याचा आदेश मानत होता. मात्र अनाचक हत्ती चिढला. त्याने रागाच्या भरात आधी बालकृष्णन यांना जमिनीवर आपटले व त्यानंतर त्यांच्या मृत्यू होईपर्यंत पायाने चिरडत राहिला.

उपस्थित पर्यटक हत्तीच्या रागापासून वाचले –

हत्तीने माहुताला ठार मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये हत्तीचा हल्ला पाहून अंगावर काटा उभा राहत आहे. दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या माहुताने या पिसाळलेल्या हत्तीला कसेतरी शांत केले. सांगितले जात आहे की, बालकृष्णन गेल्या अनेक दिवसांपासून या हत्तीचा सांभाळ करत होता. हत्तीच्या या हल्ल्यात तेथे उपस्थित पर्यटक थोडक्यात वाचले आहेत. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टमनंतर माहुताचा मृतदेह नातेवाईकांना सोपवला. माहूताला चिरडणारा हत्ता अधिक वयाचा नाही.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर