मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Andhra Murder Case: संपत्तीच्या वादातून विधवा सुनेचा निर्घृण खून; कापलेलं शीर घेऊन सासू पोलिसांकडे

Andhra Murder Case: संपत्तीच्या वादातून विधवा सुनेचा निर्घृण खून; कापलेलं शीर घेऊन सासू पोलिसांकडे

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 12, 2022 10:45 AM IST

Andhra woman beheads daughter in law: अनैतिक संबंध व संपत्तीच्या वादातून आंध्र प्रदेशातील एका महिलेनं विधवा सुनेचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.

Andhra Murder case
Andhra Murder case

Andhra woman beheads daughter in law: आंध्र प्रदेशातील अण्णामय्या जिल्ह्यात एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. प्रियकराच्या मदतीनं आपली संपत्ती हडपण्याचा विधवा सुनेचा विचार आहे या संशयातून एका महिलेनं सुनेचा निर्घृण खून केल्याचंं समोर आलं आहे. खुनानंतर आरोपी महिला सुनेचं कापलेलं शीर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली. त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

रायचोटी नगरपालिकेच्या हद्दीतील कोठाकोटा रामपुरम इथं ही घटना घडली आहे. आरोपी सासूचं नाव सुब्बम्मा आहे. मृत सून वसुधंरा (वय ३५) ही सासूसोबत राहत होती. तिला दोन मुली आहेत. वसुंधरा विधवा होती. लग्नानंतर तिचे एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. त्यामुळं त्यांच्या कुटुंबात वारंवार वादविवाद होतं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुब्बम्मा हिच्याकडं मोठी संपत्ती आहे. तिनं कुवेतला जाऊन ही संपत्ती उभी केली होती. आपली सून तिच्या प्रियकराच्या नादाला लागून सगळी संपत्ती गमावून बसेल. तसं झाल्यास आपल्या नातींचे हाल होती ही भीती तिला सतावत होती. यावरून दोघी सासू-सुनांमध्ये वाद झाला होता. वादाच्या दरम्यान सून सासूला बरंच काही बोलली. त्यामुळं सासूचा राग अनावर झाला होता. सून आपल्याला मारून टाकेल अशी शंकाही तिच्या मनात होती. त्यामुळं तिनंच सुनेवर हल्ला करून तिचं मुंडकं छाटलं. त्यानंतर ती थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.

IPL_Entry_Point

विभाग