आंध्र प्रदेशातील नांदयाल जिल्ह्यात एका तरुणाला ट्रान्सजेंडरशी लग्न करण्याचा निर्णय खूपच अंगलट आला आहे. मुलाचा हा निर्णय आणि त्याच्याशी झालेल्या वादाचा पालकांच्या मनावर इतका परिणाम झाला की त्यांनी आत्महत्या करत जागाचा निरोप घेतला. मृत दाम्पत्याच्या मुलाचे एका तृतीयपंथीसोबत प्रेमसंबंध असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, अशी माहिती स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने दिली. यावरून कुटुंब आणि ट्रान्सजेंडर समाजात वाद झाला आणि यामुळे व्यथीत झालेल्या दाम्पत्याने आत्महत्या केली.
आंध्र प्रदेश राज्यातील नांदयाल जिल्ह्यातील सुब्बा रायडू (वय ४५) आणि सरस्वती (३८) यांचा मुलगा सुनील कुमार मागील तीन वर्षापासून ट्रान्सजेंडर समुदायाशी जोडला गेला होता. या काळात त्याला एका तृतीयपंथीवर प्रेम बसले. प्रेमात तो इतका आंधळा झाला की, त्याने आपल्या आई-वडिलांच्या इच्छेच्या विरुद्ध जात तृतीयपंथीयाशी लग्न करण्याचा निश्चय केला. यामुळे समाजात आपली अब्रु जाईल या भीतीने आई-वडिलांनी आपले जीवन संपवले.
घटनेची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृत सुब्बा रायुडू आणि सरस्वती यांचा मुलगा सुनील गेल्या तीन वर्षांपासून एका ट्रान्सजेंडरसोबत रिलेशनशिपमध्ये होता. घरच्यांनी त्याच्या लग्नाबद्दल बोलले असता तो अन्य कोणत्याही मुलीशी लग्न करणार नसल्याचे सांगितले. ज्या च्याशी तो रिलेशनशीपमध्ये आहे त्याच्याशी तो लग्न करेल. यानंतर तो ट्रान्सजेंडरसोबत राहण्याबाबत बोलू लागला, ज्यामुळे कुटुंबात भांडणे होत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील कुमार याने रिलेशनशिपमध्ये असताना ट्रान्सजेंडर्सवर सुमारे दीड लाख रुपये खर्च केले होते, ज्यामुळे तो प्रचंड दबावाखाली होता. याच प्रकरणात सुनीलनेही एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण त्याचा जीव वाचला. सुनीलकडून पैसे न मिळाल्याने ट्रान्सजेंडर समाजाने ही गोष्ट त्याच्या पालकांना सांगितली. त्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भांडणात सुनीलच्या कुटुंबीयांचा ही जाहीर अपमान करण्यात आला होता. कदाचित यामुळे वैतागून त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले असावे.
कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे पोलिसांनी सांगितले. आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत.
संबंधित बातम्या