मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Road Accident: ट्रक आणि बस यांच्यात भीषण धडक; ४ जण ठार, १५ जखमी

Road Accident: ट्रक आणि बस यांच्यात भीषण धडक; ४ जण ठार, १५ जखमी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 10, 2024 09:11 AM IST

Andhra Pradesh Truck Bus Collision: आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात ट्रक आणि बस यांच्यात झालेल्या भीषण धडकेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Accident
Accident

Andhra Pradesh Nellore Accident: आंध्र प्रदेशमध्ये ट्रक आणि बस यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. ही घटना नेल्लोर जिल्ह्यातील मुसुनुरु टोल प्लाझा येथे आज (शनिवार, १० जानेवारी २०२४) घडली. अपघातामागचे नेमके कारण समोर आले नसून या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेल्लोर जिल्ह्यातील मुसुनुरु टोल प्लाझा येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या खाजगी बसने ट्रॅव्हल्स बसला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तसेच या घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र, मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. मृताची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

WhatsApp channel

विभाग