मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mass suicide: धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांची गळफास लावून आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिले...

Mass suicide: धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांची गळफास लावून आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिले...

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Dec 08, 2023 08:45 AM IST

Varanasi Mass suicide: आंध्र प्रदेशातून वाराणसीत आलेल्या एकाच कुटुंबियातील चौघांनी आत्महत्या केली.

Varanasi Suicide
Varanasi Suicide

Family Of Four Die By Suicide: आंध्र प्रदेशातील एकाच कुटुंबातील चार जणांनी वाराणसीच्या देवनाथपुरा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी संध्याकाळी उघडकीस आली. मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाइड नोट सापडली. आर्थिक अडचणींतून संबंधित कुटुंबियांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला, असा पोलिसांना संशय आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एका दाम्पत्य आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. हे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील मंदा पेटा भागातील रहिवासी असून ते ३ डिसेंबरला वाराणसी येथील एका आश्रमात आले होते, जिथे ते देवनाथपुरा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. दरम्यान, गुरुवारी संध्याकाळपर्यंत त्यांच्या खोलीतून कोणतीही हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे गेस्ट हाऊसच्या मालकाने चिंता व्यक्त केली. अनेकदा आवाज देऊन आणि दरवाजा ठोठावून खोलीतून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी पोलिसांना बोलवले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कुटुंब राहत असलेल्या खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी कुटुंबियातील सगळेच गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. तपासादरम्यान, पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट सापडली, ज्यात त्यांनी आपल्या मृत्युचे कारण लिहिले होते. या कुटुंबियातील प्रमुख ज्या ठिकाणी नोकरी करत होते, तिथे आर्थिक वाद सुरु असल्याचे चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून संबंधित कुटुबियांनी आर्थिक अडचणींतून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

WhatsApp channel

विभाग