Anant- Radhika wedding News: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले आहेत. अनेक महिन्यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशननंतर या जोडप्याने एका स्वप्नवत समारंभात लग्न गाठ बांधली, ज्यात देश आणि विदेशातील व्हीव्हीआयपी लोकांचा समावेश होता. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला असून त्यांचा वरमाला सोहळा संपला आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट एकमेकांना वरमाला घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात त्यांच्या आजूबाजुला पाहुणे दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना नवरदेवाची बहीण ईशा अंबानी पिरामल आणि वधूची बहीण अंजली मर्चंट मजीठिया दिसत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे जोडपे खूप सुंदर दिसत आहेत. वरमाला सोहळा पार पडल्यानंतर वधूची आई मंडपात नवरदेवाचे स्वागत करते.
या लग्नात रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन आणि क्लोई कार्दशियन, सॅमसंगचे चेअरमन ली जे-योंग, शाहरुख खान, सलमान खान, दीपिका पदुकोण सह बॉलिवूड ए-लिस्टर्स, इतर मित्र, कुटुंबातील सदस्य आणि इतर अनेक कलाकार उपस्थित होते.
अनंत अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांचे धाकटे चिरंजीव आहेत. १२ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एका भव्य समारंभात त्याने राधिका मर्चंटसोबत लग्न केले आहे. शतकातील लग्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लग्नात व्हीआयपी पाहुण्यांच्या प्रवेशासाठी वांद्रे कुर्ला संकुलाचा मोठा भाग सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आला होता.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची सुरुवात मार्चमध्ये तीन दिवसांच्या जल्लोषात झाली होती, जिथे पाहुण्यांना जामनगरमधील विशाल रिलायन्स इस्टेटमध्ये नेण्यात आले होते. जामनगर उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे रिहानाची खाजगी मैफिल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिलजीत दोसांझचा परफॉर्मन्स. त्यानंतर अंबानी दांपत्याने जूनच्या सुरुवातीला भूमध्य समुद्रात थांबलेल्या लक्झरी क्रूझवर अनेक पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर लग्नाच्या आदल्या आठवड्यात नवरदेवाच्या कुटुंबीयांनी जस्टिन बीबरचा परफॉर्मन्स, हळदी सोहळा, मामेरू सोहळा, मेहंदी सोहळा आणि शिवशक्ती पूजा आयोजित केली होती.
संबंधित बातम्या