Anand Mahindra Latest Tweet: धोकादायक डासांच्या चावण्यामुळे डेंग्यूसह मलेरिया, चिकुनगुनिया, एन्सेफलायटीस यांसारखे इतर आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत सर्व प्रकारच्या डासांपासून संरक्षण करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. कारण डासांचा चाव किती धोकादायक ठरू शकते, याची सर्वांनाच कल्पना आहे. डासांपासून वाचण्यासाठी अनेकजण विविध पर्यायाचा अवलंब करतात. पण आनंद महिंद्रा यांनी नुकताच्या त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, एक इलेक्ट्रिक उपकरण डासांना शोधून मारत आहे.
व्हिडिओमध्ये दिसणारे इलेक्ट्रॉनिक गॅझेट रिमोट कंट्रोल कारसारखे दिसते. महिंद्र या उपकरणाला आयर्न डोम म्हणत आहेत. आयर्न डोम हे युद्धक्षेत्रात वापरली जाते, जे कोणत्याही देशाची सुरक्षा अभेद्य करते. ही एक प्रकारची हवाई संरक्षण प्रणाली आहे. मात्र, व्हिडिओमध्ये दाखवलेला इलेक्ट्रिक गॅजेट डासांपासून तुमचे कसे रक्षण करत, हे दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
'मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमुळे लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा धोकादायक आजाराला रोखण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रॉनिक गॅझेट ऑर्डर करत आहेत. एका चिनी माणसाने हे इलेक्ट्रॉनिक गॅझेट तयार केले असून ते घरात लपलेल्या डासांना शोधून मारते, जे आयर्न डोमसारखे काम करते', असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.
आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट येत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोक या इलेक्ट्रॉनिक गॅझेटबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. काही जणांनी या इलेक्ट्रॉनिक गॅझेटची किंमत विचारली आहे. तर, काही लोक हे इलेक्ट्रिक गॅझेट कसे काम करते, याबाबत माहिती विचारत आहेत. एका युजरने लिहिले की, 'चीन आणि त्याची आविष्कार करण्याची क्षमता उर्वरित जगापेक्षा खूप पुढे आहे.' दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, 'तुम्ही मला नुकतीच अब्जाधीश व्यवसायाची कल्पना दिली.'
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत डेंग्यूचे रुग्ण आढळले असून यंदा महाराष्ट्रातील एकूण डेंग्यूच्या रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण मुंबई, नाशिक आणि कोल्हापुरात आढळले आहेत. महाराष्ट्रात ७ ऑगस्टपर्यंत डेंग्यूचे ६ हजार ७५१ तर मलेरियाचे ८ हजार ७३० रुग्ण आढळले आहेत. या अहवालानुसार राज्यात मलेरियाचे ८० टक्के रुग्ण गडचिरोली, मुंबई आणि रायगड मध्ये आढळतात.