Amul Milk New Rates: गेल्या काही काळापासून दुधाच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मात्र, आज ग्राहकांना दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. अमूलने दुधाच्या दरात कपात केली आहे. अमूलने त्यांचे तिन्ही उत्पादन अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि टी स्पेशलच्या किंमतीत प्रत्येकी १-१ रुपयांची कपात केली आहे.
या दरकपातीपूर्वी अमूल गोल्डची एक लिटर पाऊच ६६ रुपयांना विकली जात होती. जे आता ६५ रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे. अमूल टी स्पेशल दुधाची किंमत आता ६२ रुपयांऐवजी ६१ रुपये झाली आहे. तर अमूल ताजाच्या एका लिटरच्या पॅकेटसाठी आता तुम्हाला ५३ रुपये द्यावे लागणार आहेत. यापूर्वी त्यासाठी ५४ रुपये मोजावे लागत होते.
अमूलने गेल्या वर्षी दुधाच्या दरात वाढ केली होती. तेव्हा कंपनीने अमूल गोल्डच्या ५०० मिलीच्या पॅकेटच्या किंमतीत १ रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे पाकिटाची किंमत ३२ रुपयांवरून ३३ रुपयांवर गेली. तर, अमूल गोल्डच्या एका लिटरच्या पॅकेटच्या किंमतीत २ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे लोकांना ६४ रुपयांऐवजी ६६ रुपयांत अमूल गोल्डचे पाकीट मिळू लागले.
अमूलने केलेल्या या कपातीचा परिणाम आगामी काळात इतर कंपन्यांवर दिसू शकतो. इतर कंपन्याही दुधाच्या दरात कपात करू शकतात. गेल्या वर्षी जूनमध्ये मदर डेअरीने दिल्ली आणि एनसीआरमध्ये दुधाच्या दरात वाढ केली होती. अशापरिस्थितीत अमूलच्या कपातीनंतर आता मदर डेअरीकडून दर कमी होतील, अशी लोकांची अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या