मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Amritpal Singh : अमृतपाल सिंग सुवर्ण मंदिरात आत्मसमर्पण करण्याची शक्यता, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Amritpal Singh : अमृतपाल सिंग सुवर्ण मंदिरात आत्मसमर्पण करण्याची शक्यता, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 29, 2023 10:44 PM IST

Amritpal Singh : अमृतपाल हा पंजाबमध्ये परतला असून तो आत्मसमर्पण करण्याची शक्यतावर्तवली जात आहे.पंजाब पोलिसांकडूनखलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगयाच्या अटकेसाठी देशभरात सर्च ऑपरेशन केले आहे.

Amritpal Singh
Amritpal Singh

फरार अमृतपाल सिंग सरेंडर होण्याच्या चर्चेच्या दरम्यान अमृतसर ग्रामीण पोलिसांनी बुधवारी 'ह्यू एंड क्राई' (hue and cry notice) नोटीस जारी केले आहे. या नोटीसीचा उद्देश्य असतो की, आरोपीला पकडण्यासाठी सामान्य जनतेने मदत करावी.नोटीसमध्ये म्हटले आहे की, अमृतपाल सिंग संधू तरसेम सिंग यांचा मुलगा आहे, जो जल्लूपूर खेरा येथील निवासी आहे. तो अमृतसर (ग्रामीण) पोलिसांचा वॉन्टेड आरोपी आहे.

नोटीसमध्ये लोकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर कोणालाअमृतपाल यांच्याविषयी माहिती मिळाल्यास ते पोलिसांशी संपर्क करू शकतात. यासाठी पोलिसांनी संपर्क क्रमांक दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की,अमृतपाल सिंग १८ मार्चपासून फरार आहे.

पंजाब पोलिसांकडून खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगयाच्या अटकेसाठी देशभरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. पंजाब पोलिसांच्या या सर्च ऑपरेशनसाठी अनेक राज्यातील पोलीस मदत करत आहेत. दरम्यान अमृतपाल हा पंजाबमध्ये परतला असून तो आत्मसमर्पण करण्याची शक्यतावर्तवली जात आहे.

अमृतपाल हा होशियापूर येथून अमृतसरच्या दिशेने निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तो तिथून थेट सुवर्ण मंदिरात जाणार असून तिथे आत्मसमर्पण करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या सुवर्ण मंदिरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

 

अमृतपाल याच्यावर भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषणे देण्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. २३ फेब्रुवारीला अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांनी अमृतसर येथील अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. अमृतपालचा जालंधरपासून पंजाब पोलिसांच्या ५० गाडय़ांनी पाठलाग केला. पंजाब पोलिसांनी धडक कारवाई करत आतापर्यंत ७६ जणांना अटक केली आहे.

WhatsApp channel

विभाग