Amritsar-Katihar Express Viral Video: अमृतसर कटिहार एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाला मारहाण करणाऱ्या टीटीई आणि ट्रेन अटेंडंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धावत्या ट्रेनमध्ये हे दोघेही एका प्रवाशाला लाथा- बुक्क्यांनी आणि पट्ट्याने मारहाण करत असल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हेतर, संबंधित प्रवाशाला धावत्या ट्रेनमधून खाली फेकून देण्याबाबतही ते बोलत आहेत. अमृतसरहून कटिहार येथे निघालेल्या आंम्रपाली एक्सप्रेसमध्ये (१५७०८) हा प्रकार घडला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी टीटीई राजेश कुमारला अटक करण्यात आली. तर, ट्रेन अटेंडंट फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवाशी मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याने ट्रेनच्या बोगीतच उलट्या आणि लघवी केली. यानंतर टीटीईने त्याला तिकीट मागितली. परंतु, तिकीट दाखवण्याऐवजी प्रवाशाने त्यांच्या वाद घालायला सुरूवात केली आणि त्याने टीटीईच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्यांच्यात हाणामारी सुरू झाली, असे सांगण्यात आले.
या व्हिडिओबाबत रेल्वे मंत्री @RailwaySeva @RailMinIndia @Central_Railway यांनी सोशल मीडियावर एक ट्विट देखील करण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयानेही या व्हिडिओची दखल घेतली आहे. आरोपी अटेंडंट आणि टीटीईवर कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. तथापि, प्रवासी कुठून आला आणि तो खरोखर मद्यधुंद होता का. त्याच्याकडे तिकीट होते की नाही हे अद्याप कळलेले नाही.