Viral Video: अमरावती येथील एका रिक्षाचालकाने आपल्या इंग्रजी बोलण्याच्या कौशल्याने प्रवाशांना आणि इंटरनेटला आश्चर्यचकित केले आहे. एवढेच नव्हे तर इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्याने ती शिकण्याचा सल्ला ही त्यांनी दिला आणि जर कोणाला ही भाषा येत असेल तर ते लंडन, अमेरिका, पॅरिस आदी ठिकाणी जाऊ शकतात, असे रिक्षाचालक बोलत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने वृद्ध ऑटो ड्रायव्हरचा व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "त्याच्याशी बोलताना मीदेखील स्तब्ध झालो आणि थोडा गोंधळून गेलो, त्याचे इंग्रजीतील प्रभुत्व पाहून मला आश्चर्य वाटले. या व्हिडिओत लिहिले आहे की, "आज मला एक अत्यंत आश्चर्यचकित गृहस्थ भेटले, जे रिक्षाचालक आहेत. आमच्यात खूप मजेशीर गप्पा झाल्या. पण माझ्यासाठी हे खूप आश्चर्यकारक होते की, तो इंग्रजीत खूप पारंगत आहे आणि लोकांना इग्रंजी भाषा शिकण्यासाठी प्रयत्न करत आहे."
“मी तुम्हाला जे सांगतोय, माझं बोलणं खूप लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला इंग्रजी येत असेल तर तुम्ही लंडन, पॅरिस, अमेरिकेला जाऊ शकता… जर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर तुम्ही तिथे जाऊ शकत नाही” असे रिक्षाचालकाने व्हिडिओत म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी इंग्रजीचे महत्त्व अधोरेखित करणारे उदाहरण दिले. रिक्षाचालकाने सांगितले की, “जर तुम्ही लंडनच्या हॉटेलमध्ये असाल आणि वेटरकडे एक ग्लास भरलेले पाणी मागितले तर तो तुम्हाला एक ग्लास पूर्ण पाणी देईल. पण तुम्ही वेटरकरडे मराठी भाषेत पाणी मागितले, ते त्याला समजणार नाही आणि तो तुम्हाला तिथून निघून जाण्यास सांगेल. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही इंग्रजी शिका, ती एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे”, असे ते म्हणाले.
दरम्यान, २५ जून २०२४ रोजी शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ ३० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हा आकडा अजूनही वाढतच आहे. अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये ही आपले विचार मांडले.
"भारत नवोदितांसाठी नाही," एका व्यक्तीने म्हटले आहे. दुसऱ्याने लिहिले की, “छान.” "वाह, आश्चर्यकारक," तिसऱ्याने कमेंट केली. ते भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखे वाटतात, असे कमेंट सेक्शनमधील अनेकांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या