Maharashtra Karnataka border dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आज नवी दिल्लीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली, याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईआणि कर्नाटकचे गृहमंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर यातील निर्णयांची माहितीगृहमंत्री अमित शाह यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या बैठकीत महाराष्ट्राच्या बाजूने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी योग्य पद्धतीने बाजू मांडावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती.
अमित शहांनी म्हटले की, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात सीमावाद निर्माण झाला होता. या वादाचा शेवट आणि त्यावर संवैधानिक मार्ग काढण्यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व कर्नाटकचे मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांना आज इथे बोलवलं होतं. दोन्ही बाजूंशी भारत सरकारच्या गृह विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चांगल्या वातावरणात बोलणी झाली. दोन्ही बाजूंनी सकारात्मक भूमिका ठेवली आहे.