मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अमेरिकेतील महिलांनी उपसले ‘सेक्स स्ट्राईक’चे हत्यार; गर्भपात बंदी कायद्याला विरोध वाढला

अमेरिकेतील महिलांनी उपसले ‘सेक्स स्ट्राईक’चे हत्यार; गर्भपात बंदी कायद्याला विरोध वाढला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 27, 2022 03:25 PM IST

अमेरिकेत गर्भपात बंदी विरोधाच्या कायद्यात आता महिला रस्त्यावर आल्या आहेत. गर्भपाताचा अधिकार मिळवण्यासाठी महिला लढा उभारत असून विविध आंदोलने करत आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून पुरुषांशी शरिर संबंध न ठेवण्याचा निर्णय महिलांनी घेतला आहे.

अमेरिकेत गर्भपात बंदी विरोधाच्या कायद्यात आता महिला रस्त्यावर आल्या आहेत.
अमेरिकेत गर्भपात बंदी विरोधाच्या कायद्यात आता महिला रस्त्यावर आल्या आहेत.

वॉशिंगटन : अमेरिकेच्या न्यायालयाने गर्भपात बंदीच्या निर्णयाविरोधात महिला आक्रमक झाल्या आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे २६ राज्यात महिलांना गर्भपात करता येणार नाही. अनेक महिला या निर्णयाविरोधात आंदोलने करत आहेत. मात्र, एका आंदोनामुळे पुरुषांची झोप उडवली आहे. गर्भपाताचा अधिकार मिळावा तसेच न्यायालयाच्या निर्णया विरोधात अमेरिकेतील माहिला ‘सेक्स स्ट्राईकवर’ (Sex Strike) गेल्या आहेत. त्यांनी पुरुषांसोभत शरिर संबंध ठेवण्यास नकार दिला आहे. या संदर्भाात समाज माध्यमांवर संदेश फिरवले जात आहे. जो पर्यंत न्यायालय हा निर्णय मागे घेत नाही तो पर्यंत महिलांनी पुरुषांशी संबंध ठेवण्यास नकार दिला आहे. समाज माध्यमांवर या स्ट्राईकची चांगलीच चर्चा होत आहे. तसेच महिला याला सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे.

एका व्टिटर युझरने लिहिले आहे की, ‘अमेरिकेत महिलांनी हा संकल्प केला आहे की, आम्ही अनपेक्षित गर्भधारणनेची जोखिम घेऊ शकत नाही. यामुळे आम्ही कुठल्याच पुरुषासोबत शरिर संबंध ठेऊ शकत नाहीत. या सोबतच जो पर्यंत त्यांची आई होण्याची इच्छा होत नाही तोपर्यंत आपल्या पती सोबतही महिलांनी शरिर संबंध ठेवण्यास नकार दिला आहे.

एका दुस-या युझरने म्हटले आहे की, मी न्यूयॉर्कमध्ये राहते. मी न्यायालयाच्या निर्णया विरोधात आहे. मी अशा महिलांचा शोध घेत आहे, ज्या महिला सेक्स स्ट्राईकचे समर्थन करत आहेत. हीच आमची ताकद आहे. जो पर्यंत गर्भपाताच्या निर्णयाचे कायद्यात रुपांतर होत नाही, तो पर्यंत पुरुषांशी संबंध ठेवण्याचा आमचा निर्णय आहे. व्टिटरवर, सेक्स स्ट्राईक सोबतच  #abstinence ट्रेन्ड करत आहे. एका महिलेने देशव्यापी ‘सेक्स स्ट्राईकची मागणी केली आहे. जो पर्यंत महिलांना गर्भपाताचा अधिकार मिळत नाही तो पर्यंत ही स्ट्राईक सुरूच राहणार असे या महिलेनं म्हटले आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर महिला आल्या रस्त्यावर

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महिलांसोबत नागरिकही रस्त्यावर आले आहेत. पोलिसांनी एरिजोनाच्या राजधानीच्या शहराबाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलक प्रदर्शन आणि निदर्शेने करत आहेत. त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या कांड्या फोडण्यात आल्या. आंदोलकांनी या निर्णयाविरोधात सीनेट भवनाच्या काचा फोडल्या, तसेच दरवाजाही तोडण्याचा प्रयत्न केला. या आंदोलना दरम्यान, संसंद सदस्यांना इमारतीच्या तळमल्यात सुरक्षित ठेवण्यात आले होते.

IPL_Entry_Point

विभाग