Viral News : अंडरवेअर कशी घालायची? एअर लाइन्सकडून गाइडलाइन्स जारी; जगभरात चर्चा!-american company delta air lines issue guidelines for undergarments and other ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : अंडरवेअर कशी घालायची? एअर लाइन्सकडून गाइडलाइन्स जारी; जगभरात चर्चा!

Viral News : अंडरवेअर कशी घालायची? एअर लाइन्सकडून गाइडलाइन्स जारी; जगभरात चर्चा!

Sep 18, 2024 03:40 PM IST

Delta Air Lines Guidelines: एअर लाइन्सकडून जारी करण्यात आलेल्या गाइडलाइन्समध्ये अंडरवेअर कशी घालायची? याबाबतही नियम तयार करण्यात आला.

अंडरवेअर कशी घालायची? एअर लाइन्सकडून गाइडलाइन्स जारी
अंडरवेअर कशी घालायची? एअर लाइन्सकडून गाइडलाइन्स जारी

Viral News: अमेरिकन कंपनी डेल्टा एअर लाइन्सने आपल्या कंपनीत फ्लाइट अटेंडंट बनण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांसाठी कडक नियम लागू केले आहेत, ज्यात अंडरवेअर कशी घालायची? या नियमाचाही समावेश आहे. डेल्टा एअर लाइन्सने जारी गाइडलाइन्समध्ये पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत कसे असायला हवे, हे स्पष्ट केले. अमेरिकन कंपनी डेल्टा एअर लाइन्सच्या गाइडलाइन्सची जगभरात चर्चा रंगली आहे.

डेल्टा एअर लाइन्सने गाइडलाइन्स जारी करताना असे स्पष्ट केले आहे की, फ्लाइट अटेंडंट हे आपल्या एअर लाईन्सचा चेहरा असतो आणि ते प्रवाशांसोबत सर्वात जास्त वेळ घालवतात. फ्लाइट अटेंडंटकडून प्रवाशांसाठी स्वागतार्ह आणि आनंददायी वातावरण तयार करणे अपेक्षित आहे.

अमेरिकन कंपनी डेल्टा एअर लाइन्सची गाइडलाइन्स

- केस नैसर्गिक असावेत. केसांना हायलाइट्स किंवा आर्टिफिशियल शेड्स केलेले नसावे.

- लांब केस खांद्याच्या मागे आणि वर बांधावेत.

- डोळे नैसर्गिक हवेत. लेन्स वापरण्यास बंदी आहे.

- नखे व्यवस्थित कापलेले असावीत. नियॉन कलर, मल्टी कलर, ग्लिटर किंवा हँडमेड अशाप्रकारची कोणतीही डिझाइनला नखांवर नको.

- टॅटू लपवणे बंधनकारक आहे. परंतु, टॅटू लपवण्यासाठी बँडेजचा वापर करू शकत नाही. पण कपडा किंवा वॉटरप्रूफ मेकअप लावू शकतात.

- नाकात फक्त एकच रिंग टाकू शकतात. तर, प्रत्येकी कानात फक्त दोन रिंग घालण्याच परवानगी आहे.

- ड्रेस किंवा स्कर्ट गुडघ्यापर्यंत असावा. स्पोर्ट्स शूज घालण्यास परवानगी नाही. फ्लाइट अटेंडंट हील्स घालू शकतात किंवा स्लिंग बॅक शूज घालू शकतात.

विमान हवेत असताना प्रवाशाला कपडे फाटेपर्यंत मारहाण

गुवाहाटीहून अगरतळाला जाणाऱ्या विमानात एका प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर विमानात एकच गोंधळ उडाला. यानंतर सहप्रवाशांनी त्याला मागे खेचले. पंरतु, तो ऐकत नसल्याने त्याला मारहाण करण्यात आली. गुवाहाटीहून अगरतळाला येणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात नशेत असलेल्या व्यक्तीचे कपडे फाटलेले दिसत आहे. पण क्रू मेंबर्संनी मारहाण न करण्याची विनंती केली. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Whats_app_banner
विभाग