विमानात झालेल्या गोंधळाचे व्हिडिओ इंटरनेटवर नेहमी व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. कोणाला उंचीची भीती वाटते आणि फ्लाइट टेकऑफ केल्यानंतर त्यांची भीती गोंधळात बदलते. तसेच काही लोक सीटवरूनही विमानात वाद घातलाना दिसून येतात.
नुकताच एक अजब प्रकार समोर आला आहे. डोक्यातील एक ऊ मुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. उवा डोक्यातील किडे असतात जे केसांना चिटकलेल्या असतात. मात्र या छोट्याशा कीटकामुळे विमानाचे आपत्तीकालीन लँडिंग करावे लागण्याची परिस्थिती उद्धवल्याची स्थिती येऊ शकते का?
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, फ्लाइटमधील प्रवासी एथन जुडलसन यांनी टिकटॉकवर आपला अनुभव शेअर केला आहे. त्यांनी म्हटले की, आमची फ्लाइट लॉस एंजिल्सहून न्यूयॉर्कला जाणार होती. मात्र अचानक फीनिक्समध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. मला समजले नाही की, असे का केले.
जुडेलसन यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या आजुबाजुला पाहिले, कोणीही प्रवासी घाबरलेला नव्हता. जसे आम्ही लँड केले आमच्या समोर बसलेली महिला विमानाच्या समोर पळाली. ती विमानातून सर्वात आधी उतरणार होती.
विमानात महिलेच्या डोक्यात मोठ्या प्रमाणात उवा होत्या. दोन प्रवाशांनी या महिलेल्या केसांमध्ये उवा पाहिल्यानंतर एअर होस्टेसला यासंदर्भात कळवलं. त्यामुळे विमानातील इतर सहकाऱ्यांना त्रस होत होता. त्यामुळे ऍरिझोना येथे अचानक लँडिंग करण्यात आले.
प्रवाशांना सांगितले की, १२ तासांचा विलंब होणार आहे. एअरलाइनने सर्व प्रवाशांना हॉटेलचे व्हाऊचर दिले. जुडेलसन यांनी विचार केला की, ते अनिश्चित काळासाठी फीनिक्समध्ये अडकले आहेत. अमेरिकन एअरलाइन्सने म्हटले की, मेडिकल इर्मजन्सीमुळे फ्लाइट डायवर्ट केले होते.
त्यानंतर समजले की, इमर्जन्सी लँडिंगचे कारण ऊवा होत्या. जुडेलसन यांनी अन्य प्रवाशी चर्चा करताना ऐकले की, महिलेल्या डोक्यावरील केसात किडे दिसल्याने विमानाचे लँडिंग करण्यात आले. यानंतर १२ तासांनी प्रवासी न्यूयॉर्ककडे रवाना झाले. उवांमुळे प्रवाशांचा वेळ वाया गेला.
यावर विमान कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. विमानात महिलेच्या डोक्यात मोठ्या प्रमाणात उवा होत्या. दोन प्रवाशांनी या महिलेल्या केसांमध्ये उवा पाहिल्यानंतर एअर होस्टेसला यासंदर्भात कळवलं. त्यामुळे विमानातील इतर सहकाऱ्यांना त्रस होत होता. त्यामुळे ऍरिझोना येथे अचानक लँडिंग करण्यात आले.