भारताचा दु्र्मिळ खजिना पुन्हा ताब्यात; तब्बल २९७ दुर्मिळ वस्तू अमेरिकेनं परत केल्या!-america returns 297 indian antiquities pm modi 640 total in ten years ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारताचा दु्र्मिळ खजिना पुन्हा ताब्यात; तब्बल २९७ दुर्मिळ वस्तू अमेरिकेनं परत केल्या!

भारताचा दु्र्मिळ खजिना पुन्हा ताब्यात; तब्बल २९७ दुर्मिळ वस्तू अमेरिकेनं परत केल्या!

Sep 23, 2024 12:03 PM IST

america returns 297 indian antiquities : सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमेरिकेने २९७ भारतीय अनोख्या व दुर्मिळ वस्तु परत केल्या आहेत. यासह २०१४ पासून परदेशातून ६४० हेरिटेज वस्तू परत देखील परत करनेत आल्या आहेत. यामध्ये कलाकृती व शिल्पांचाही समावेश आहे.पंतप्रधान मोदी

अमेरिकेका करणार भारताचा 'खजिना' परत! तब्बल २९७ दुर्मिळ वस्तु प्रदीर्घ काळानंतर येणार देशात
अमेरिकेका करणार भारताचा 'खजिना' परत! तब्बल २९७ दुर्मिळ वस्तु प्रदीर्घ काळानंतर येणार देशात

america returns 297 indian antiquities : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याला मोठे यश मिळाले आहे. तस्करीच्या माध्यमातून देशाबाहेर नेलेल्या व भारतीय संस्कृतीशी संबंधित २९७ अनोख्या व दुर्मिळ वस्तू अमेरिकेने भारताला परत केल्या आहेत. मौल्यवान आणि पुरातन वस्तूंची चोरी आणि तस्करी ही गंभीर समस्या आहे. २१०४ पासून, भारताने परदेशातून सुमारे ६४० वस्तू परत मिळवण्यात यश आले आहे.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आभार मानले आहेत. मोदी म्हणाले की, अवैध व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांविरुद्धचा लढा अधिक मजबूत होत आहे. २९७ दुर्मिळ कलाकृती परत केल्याबद्दल आम्ही राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अमेरिकन सरकारचे आभारी आहोत.

याआधीही पीएम मोदींच्या अमेरिका दौऱ्यात अनेक प्राचीन वस्तू भारताला परत करण्यात आल्या आहेत. २०२१ मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांना १५७ दुर्मिळ वस्तु परत करण्यात आल्या होत्या. त्यात १२व्या शतकातील नटराज मूर्तीचाही समावेश होता. २०२३ मध्ये पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर अमेरिकेने १०५ वस्तू भारताला परत करण्यात आल्या होत्या. अमेरिकेतून ५७८ प्राचीन आणि अमूल्य वस्तू भारतात परत आणण्यात आल्या आहेत.

अमेरिकेशिवाय ब्रिटनमधून १६ आणि ऑस्ट्रेलियातून १४ कलाकृती मायदेशी परत आणण्यात आल्या आहेत. तर २००४ ते २०१३ या कालावधीत भारताला परदेशातून एकच कलाकृती मिळवण्यात यश आले होते. जुलै २०२४ मध्ये, ४६ व्या जागतिक वारसा समितीच्या बाजूने नवी दिल्ली येथे अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक मालमत्ता करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार सांस्कृतिक व पुरातन वस्तूंची अवैध तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ठरवण्यात आले होते.

१० वर्षापासून प्राचीन खजिना भारतात आणण्यासाठी प्रयत्न

गेल्या १० वर्षांपासून भारताने आपला प्राचीन 'खजिना' परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचा परिणाम सध्या दिसून येत आहे. पंतप्रधान मोदींच्या जागतिक नेत्यांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांमुळे भारताचा वारसा परत आणण्यास मदत झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तस्करीच्या माध्यमातून परदेशात पोहोचलेल्या कलाकृती आणि शिल्प भारताच्या प्राचीन संस्कृतीशी जोडलेले आहेत.

Whats_app_banner
विभाग