मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mexico Firing: अमेरिका गोळीबाराने पुन्हा हादरली, महापौर अन् पोलिसांसह १८ जणांचा मृत्यू

Mexico Firing: अमेरिका गोळीबाराने पुन्हा हादरली, महापौर अन् पोलिसांसह १८ जणांचा मृत्यू

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 06, 2022 08:44 AM IST

Mexico Firing: बुधवारी दुपारी अचानक बंदुक घेऊन सिटी हॉलमध्ये काही जण पोहोचले. त्यांनी लोकांवर बेछूट गोळीबार सुरू केला.

अमेरिका गोळीबाराने पुन्हा हादरली, महापौर अन् पोलिसांसह १८ जणांचा मृत्यू
अमेरिका गोळीबाराने पुन्हा हादरली, महापौर अन् पोलिसांसह १८ जणांचा मृत्यू

Mexico Firing: अमेरिकेत होणाऱ्या गोळीबाराच्या घटना कमी होत नसल्याचं दिसून येत आहे. पुन्हा एकदा अमेरिका गोळीबाराने हादरली असून मेक्सिकोतील सिटी हॉलमध्ये झालेल्या बेछूट गोळीबारात महापौरांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. मेक्सिकोमध्ये ही घटना बुधवारी घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी अचानक बंदुक घेऊन सिटी हॉलमध्ये काही जण पोहोचले. त्यांनी लोकांवर बेछूट गोळीबार सुरू केला. या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महापौर कॉनराडो मेंडोजा आणि त्यांचे वडील माजी महापौर जुआन मेंडोजा यांचाही समावेश आहे. तसंच ७ पोलिस कर्मचाऱ्यांचाही यावेळी मृत्यू झाला.

गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी पूर्ण शहराची नाकेबंदी केली आहे. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हल्ला पूर्वनियोजीत असावा अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेचे काही फोटो आता समोर येत असून यामध्ये सिटी हॉलच्या भिंतीवर गोळ्यांच्या खुणा दिसत आहेत. हॉलच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या आहेत.

अमेरिकेत गोळीबाराच्या घटना सातत्याने घडतात. मेक्सिकोतही आता अशा घटना घडू लागल्या आहेत. मेक्सिकोत होणारा गोळीबार हा ड्रग्ज तस्करांमधील किंवा गँगवॉरशी संबंधित असतो.याआधी जुलै महिन्यात ग्रीनवूड पार्क मॉलमध्ये गोळीबार झाला होता. यात तिघांचा मृत्यू झाला होता. तर ११ जुलैलासुद्धा तिघे ठार झाले होते. सर्वात मोठी गोळीबाराची घटना १५ मे रोजी झाली होती. टेक्सासमध्ये एका १८ वर्षाच्या मुलाने शाळेत केलेल्या गोळीबारात १९ विद्यार्थ्यांसह २३ जण मृत्यूमुखी पडले होते.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग