अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या भीषण अग्निकांडामुळे मोठे नुकसान झाले आहे. ही कॅलिफोर्नियापर्यंत पसरली असून हजारो इमारती जळून खाक झाल्या आहेत. ही आग सध्या लॉस एंजेलिसमध्ये १४ हजार एकरच्या परिसरामध्ये पसरलेली आहे. वणव्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० वर पोहोचली असून जवळपास १० हजाराहून अधिक इमारती जळाल्या आहेत.
अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आह विक्राळ रुप घेत आहे. जंगलात लागलेली आह आत रहिवासी परिसरात पसरली आहे. हॉलीवूडनगरी समजली जाणारी लॉस एंजेलिस नगरी होरपळत आहे.
पश्चिम लॉस एंजेलिसमधील पॅलिसेड्स आग आणि पूर्वेला पासाडेनाजवळील ईटन आगीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून इतिहासातील सर्वात भीषण आपत्ती म्हणून त्याचे वर्णन केले जात आहे. आगीत आतापर्यंत ३४ हजार एकर म्हणजेच १३ हजार ७५० हेक्टर जमीन जळून खाक झाली आहे. त्याचबरोबर संपूर्ण शहरात राख आणि खराब हवेमुळे श्वास घेणे अवघड होत आहे. १० हजारांहून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत. गुरुवारी वादळी वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाळा पुन्हा तीव्र झाल्या आहेत.
लॉस एंजेलिस काउंटी मेडिकल एक्झामिनरच्या मेडिकल एक्झामिनरने गुरुवारी रात्री उशिरा एक अपडेट जारी केले की आगीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे. याआधी लॉस एंजेलिस काउंटीचे पोलीस अधिकारी रॉबर्ट लूना यांनी पत्रकार परिषदेत ही संख्या आणखी वाढू शकते, असे सांगितले होते. या भागात अणुबॉम्ब पडल्यासारखे दिसत आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. आतापर्यंत जवळपास १,८०,००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
दरम्यान, बुधवारी सेंट अॅना नावाच्या वादळी वाऱ्यांच्या वेगात किंचित घट झाली. मात्र, गुरुवारी रात्रीपासून पुन्हा एकदा वाऱ्याचा जोर वाढल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. शुक्रवारी या भागात जोरदार कोरडे वारे वाहण्याची शक्यता असल्याने परिस्थिती बिकट होत चालली आहे. दरम्यान, या आगीमुळे आतापर्यंत १३५ अब्ज डॉलरते १५० अब्ज डॉलरचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज अमेरिकेतील खासगी हवामान संस्था अॅक्युवेदर ने वर्तवला आहे.
वेस्ट हिल्स मध्ये गुरुवारी दुपारी आगी लागली. या प्रकरणी लॉस एंजेलिस पोलीस विभागाने (एलएपीडी) एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या आगीत अब्जावधी डॉलर्सची मालमत्ता जळून खाक झाली आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ही आग ८०० एकरात पसरली आहे.
एलएपीडीचे वरिष्ठ प्रमुख अधिकारी सीन दिनसे यांनी सांगितले की, वुडलँड हिल्स भागात जाळपोळीच्या संशयिताला नागरिकांनी ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित ३० वर्षांचा बेघर व्यक्ती आहे. दरम्यान, बुधवारी आणि गुरुवारी आगीमुळे घरे सोडून लोक सुरक्षित स्थळी गेले होते. त्यावेळी बंद घरे लुटणाऱ्या २० जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
संबंधित बातम्या