मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बाप रे.. १० नाही, तर २० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत Amazon, वरिष्ठांवरही टांगती तलवार

बाप रे.. १० नाही, तर २० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत Amazon, वरिष्ठांवरही टांगती तलवार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 04, 2022 08:00 PM IST

Amazon layoff : ॲमेझॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांपासून उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. कारण कंपनीने तब्बल २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची तयारी सुरू केली आहे.

Amazon layoff
Amazon layoff

ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन (Amazon layoff) २० हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवू शकते. यापूर्वी कंपनीच्या रिपोर्टनुसार १० हजार कर्मचाऱ्यांची गच्छंती करण्याची योजना होती.रिपोर्टनुसार कंपनी आपल्या अनेक विभागात कर्मचारी कपात करू शकते. यामध्ये डिस्ट्रीब्यूशन सेंटर, टेक्नोलॉजी स्टाफ आणि  कॉरपोरेट एक्झिक्यूटिव्ह कर्मचारी आदिंचा समावेश आहे. कंपनीकडून येत्या काही महिन्यात ही कर्मचारी कपात केली जाईल.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार ॲमेझॉनचे सीईओ एंडी जेसी यांनी नुकत्याच या वृत्ताला दुजोरा दिला होता की, कंपनी अनेक विभागातील कर्मचाऱ्यांच्या कपातीची तयारी करत आहे. मात्र त्यांनी किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाईल, याचा आकडा जाहीर केला नव्हता. नोव्हेंबर महिन्यात काही कंपनीच्या सूत्रांनी माध्यमांना सांगितले होते की, कंपनी १०, ००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची योजना बनवत आहे.

कर्मचारी कपातीची संख्या १० हजाराहून होऊ शकते २० हजार -

आता एका नव्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ही कपात दुप्पट होऊ शकते.ॲमेझॉन सर्व विभागातील लोकांना काढण्याची तयारी करत आहेत. यामध्ये उच्च पदस्थ अधिकारऱ्यांचाही समावेश आहे. कंपनी व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांच्या कामाचे ऑडिट करत आहे. जेणेकरून २० हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाऊ शकेल. कंपनी आपल्या कॉरपोरेट स्टाफमध्ये ६ टक्के कपात करणार आहे. ॲमेझॉनच्या १.५ दशलक्ष कर्मचाऱ्यांपैकी जवळपास १.३ टक्के कर्मचाऱ्यांना निरोप दिला जाईल.

कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉरपोरेट कर्मचाऱ्यांना यापूर्वीच सतर्क करण्यात आले आहे. प्रभावित कर्मचाऱ्यांना २४ तासांची नोटीस आणि सर्वेंस दिला जाईल. कर्मचारी कपातचे वृत्त समोर आल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या कर्मचारी कपातीमागे कोविड महामारी दरम्यान ओव्हर-हायरिंग कारण सांगितले जात आहे. कंपनीचे आर्थिक नुकसान नियंत्रित करण्यासाठी कर्मचारी कपात केली जात आहे.

ॲमेझॉनच्या सीईओने नुकतीच घोषणा केली होती की, कर्मचारी कपातीची प्रक्रिया पुढील काही महिने सुरू राहील. यापूर्वी कर्मचाऱ्यांना नोटीस दिली जाईल. सांगितले जात आहे की, कामावरून कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संख्या वाढू शकते.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग