Amazon Great Indian Festival Sale 2024 : अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२४ सर्व ग्राहकांसाठी २७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. अॅमेझॉनच्या या सेलमध्ये स्मार्टफोन ४० टक्क्यांपर्यंत स्वस्त मिळणार आहेत.
जर तुम्ही फोल्डेबल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सेलमध्ये तुमच्यासाठी खूप काही आहे. सेलमध्ये ऑफरचा फायदा घेत तुम्ही टेक्नोचा फोल्डेबल फोन अवघ्या २८,६४९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत खरेदी करू शकता.
या सेलमध्ये मोटोरोला आणि सॅमसंगचे फ्लिप फोल्डेबल फोनही स्वस्त दरात उपलब्ध आहेत. फ्लिप फोल्ड फोनवर उपलब्ध असलेल्या डील्सवर एक नजर टाकूया.
अॅमेझॉनने खुलासा केला आहे की, आगामी ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेल २०२४ मध्ये टेक्नोचा फ्लिप फोल्डेबल फोन Tecno Phantom V Flip 5G हा ऑफरमध्ये २८,६४९ रुपयांमध्ये उपलब्ध होईल. या किंमतीत बँक आणि कूपन ऑफरचा समावेश आहे. सध्या हा फोन अॅमेझॉनवर ५४,८९९ रुपयांच्या किंमतीसह लिस्ट झाला आहे.
फोनमध्ये ४५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ड्युअल एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात ६.९ इंचाचा मेन आणि १.३२ इंचाचा कव्हर डिस्प्ले आहे. फोनमध्ये डायमेंसिटी ८०५० ५जी प्रोसेसर देण्यात आला आहे.
Motorola razr 40 Ultra हा फोन ऑफरमध्ये ४२,९९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध असेल. फोनमध्ये ६.९ इंचाचा मुख्य पीओएलईडी डिस्प्ले आणि ३.६ इंचाचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसरसह सुसज्ज आहे.
यात ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कव्हर स्क्रीनवर दोन कॅमेरे आहेत, ज्यात ओआयएससह १२ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. फोनमध्ये ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ३८०० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
Motorola razr 50 ultra हा फोन सेलमध्ये ७९,९९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत उपलब्ध असेल. फोनसोबत मोटो बड्स प्लस देखील फ्री असेल. यात ६.९ इंचाचा मेन डिस्प्ले आणि ४ इंचाचा कव्हर डिस्प्ले आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 3 प्रोसेसर आहे.
हा फोन वॉटर प्रोटेक्शन रेटिंगअंतर्गत आयपीएक्स ८ सोबत येतो. फोनमध्ये ओआयएससह ५० मेगापिक्सलचा मेन सेन्सर आणि ३० एक्स एआय सुपर झूमसह ५० मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ४५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
Samsung Galaxy Z Flip6 5G हा फोन सेलमध्ये ९४,९९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत उपलब्ध असेल. फोनमध्ये गॅलेक्सी एआय सपोर्ट उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा वाइड कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा देण्यात आला आहे.
सेल्फीसाठी फोनमध्ये १० मेगापिक्सलचा लेन्स देण्यात आला आहे. फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, फोन फुल चार्जमध्ये 68 तासांचा म्युझिक प्लेटाइम देतो. हा फोन आयपी ४८ वॉटर रेझिस्टंट रेटिंगसह येतो.