Amazon Sale : १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील हे ६ ब्रँडेड स्मार्टफोन्स, यादी पाहा-amazon great india festival sale these 6 branded smartphones will available for less than rs 15 thousand here list ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Amazon Sale : १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील हे ६ ब्रँडेड स्मार्टफोन्स, यादी पाहा

Amazon Sale : १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील हे ६ ब्रँडेड स्मार्टफोन्स, यादी पाहा

Sep 21, 2024 03:34 PM IST

Amazon Great India Festival Sale : अ‍ॅमेझॉन सेलमध्ये स्मार्टफोन आणि अ‍ॅक्सेसरीज ४० टक्क्यांपर्यंत स्वस्त मिळणार आहेत. अ‍ॅमेझॉन हळूहळू डील्स जाहीर करत आहे. मात्र, कंपनीने अनेक स्मार्टफोन डील्सचा खुलासा केला असून ऑफरनंतर त्यांची प्रभावी किंमत किती असेल हे सांगितले आहे.

Amazon Great India Featival Sale
Amazon Great India Featival Sale

Amazon Great India Festival Sale : अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडिया फेस्टिव्हल सेल २७ सप्टेंबरपासून सर्वांसाठी सुरू होणार आहे. मात्र, प्राईम मेंबर्सला एक दिवस आधीपासून म्हणजेच २६ सप्टेंबरपासून डील्सचा लाभ घेता येणार आहे. 

अ‍ॅमेझॉन सेलमध्ये स्मार्टफोन आणि अ‍ॅक्सेसरीज ४० टक्क्यांपर्यंत स्वस्त मिळणार आहेत. अ‍ॅमेझॉन हळूहळू डील्स जाहीर करत आहे. मात्र, कंपनीने अनेक स्मार्टफोन डील्सचा खुलासा केला असून ऑफरनंतर त्यांची प्रभावी किंमत किती असेल हे सांगितले आहे. तुमच्या सोयीसाठी आम्ही अशा फोनची यादी तयार केली आहे, जी १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होतील.

Amazon Great India Festival Sale
Amazon Great India Festival Sale

१)  Realme 13C 5G

Realme 13C 5G या फोनचा ४ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंट ऑफरमध्ये ९,१९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत उपलब्ध होईल. फोनमध्ये गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शन आणि ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७४ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी ६१००+५जी प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी आहे.

२)  iQOO Z9 Lite 5G

iQOO Z9 Lite 5G या फोनचा ४ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंट ९,४९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत मिळेल. फोनमध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.५६ इंचाचा अल्ट्रा ब्राइट डिस्प्ले देण्यात आला आहे. 

यात मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० ५जी प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी हा फोन आयपी ६४ रेटिंगसह येतो.

३) Redmi 13 5G

Redmi 13 5G या फोनचा ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंट ऑफरमध्ये १२,९९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत उपलब्ध होईल. फोनमध्ये गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शन आणि ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन २ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा आणि ५०३० एमएएचची बॅटरी आहे.

Amazon Great India Festival Sale
Amazon Great India Festival Sale

४) Tecno Pova 6 Neo

Tecno Pova 6 Neo या फोनचा ८+२५६ व्हेरियंट ऑफरमध्ये १२,७४९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत उपलब्ध होईल. फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.६७ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी आहे.

Amazon Great India Festival Sale
Amazon Great India Festival Sale

५) POCO M6 5G

POCO M6 5G या फोनचा ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंट ९,४९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत उपलब्ध असेल. फोनमध्ये गोरिल्ला ग्लास ३3 प्रोटेक्शन आणि ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७४ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी ६१००+५जी प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी आहे.

ऑर्डर करण्यासाठी क्लिक करा

६) HMD Crest Max 5G

HMD Crest Max 5G हा फोन ११,९९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीत उपलब्ध असेल. फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ५० एमपी सेल्फी कॅमेरा असणारा हा सेगमेंटमधील पहिला फोन आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Whats_app_banner