मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Amazon: अयोध्यातील राम मंदिराच्या नावाखाली मिठाईची विक्री, अ‍ॅमेझॉनला नोटीस

Amazon: अयोध्यातील राम मंदिराच्या नावाखाली मिठाईची विक्री, अ‍ॅमेझॉनला नोटीस

Jan 20, 2024 06:11 PM IST

Amazon gets notice Over Fake PraSad: अ‍ॅमेझॉनवर 'रघुपती तूप लाडू', 'खोया खोबी लाडू', 'तूप बुंदी लाडू' आणि 'देशी गायीच्या दुधाचा पेडा' यांची राम मंदिराच्या नावाखाली विक्री केली जात आहे.

Amazon
Amazon (Reuters)

Amazon News: 'अयोध्यातील राम मंदिरातील प्रसाद' या नावाने मिठाईची विक्री केल्याप्रकरणी ई- कॉमर्स कंपनीअ‍ॅमेझॉनला नोटीस पाठवण्यात आली. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच कॅटने केलेल्या निवेदनाच्या आधारे मुख्य आयुक्त रोहितकुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कारवाई सुरू केली आहे. अमेझॉनवर विक्री होत असलेल्या मिठाईमध्ये 'रघुपती तूप लाडू', 'खोया खोबी लाडू', 'तूप बुंदी लाडू' आणि 'देशी गायीच्या दुधाचा पेडा' यांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवर मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे, जे अयोध्यातील राम मंदिरातील प्रसाद असल्याचा दावा केला जात आहे. अमेझॉन ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात मिठाई आणि विविध पदार्थांची खरेदी करत आहे. मात्र, ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. याप्रकरणी सीसीपीएने अ‍ॅमेझॉनकडून आठवडाभरात उत्तर मागितले आहे. अन्यथा ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ च्या तरतुदींनुसार त्यांच्यावर आवश्यक कारवाई केली जाण्याचा इशारा दिला.

दरम्यान, दिशाभूल करणारी जाहिरात, उत्पादन किंवा सेवेचे खोटे वर्णन करणे, पदार्थाच्या प्रमाण किंवा गुणवत्तेबद्दल ग्राहकांची दिशाभूल करण्याची खोटी हमी देऊन दिशाभूल करणे, या विरोधात ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्या कलम २ (२८) अन्वये कारवाई केली जाते. या नोटिशीला उत्तर देताना अ‍ॅमेझॉनने म्हटले आहे की, "आम्हाला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून काही विक्रेत्यांकडून दिशाभूल करणारे उत्पादन दावे आणि उल्लंघनासाठी त्यांची चौकशी करण्यासंदर्भात पत्र मिळाले. दरम्यान, आम्ही आमच्या धोरणानुसार अशा सूचींवर योग्य ती कारवाई करत आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २२ जानेवारीला रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे या सोहळ्यासाठी सात हजारांहून अधिक लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी वाराणसीचे पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित प्राण प्रतिष्ठा सोहळा सादर करतील. दुपारी एक वाजेपर्यंत या सोहळ्याचा समारोप होणार आहे.

Ram Lalla Idol: किती मनमोहक रुप..! प्राणप्रतिष्ठेपूर्वीच रामल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर, पाहा PHOTO

म्हैसूरयेथील शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेसाठी निवड करण्यात आली आहे. अभिषेक सोहळ्याच्या सात दिवसांच्या विधीला मंगळवारपासून सुरुवात झाली. या विधींमध्ये पूजेच्या विविध प्रकारांचा समावेश आहे. २१ जानेवारी ला रामलल्लाच्या देवतेला १२५ कलशांसह दिव्य स्नान मिळणार आहे. २२ जानेवारीच्या कार्यक्रमानंतर राम मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. भारतभरातून दररोज हजारो भाविक आणि पर्यटक या मंदिराला भेट देतील, अशी अपेक्षा आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग