Fact Check: दारुच्या नशेत तेजस्वी यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधला? व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check: दारुच्या नशेत तेजस्वी यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधला? व्हिडिओ व्हायरल

Fact Check: दारुच्या नशेत तेजस्वी यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधला? व्हिडिओ व्हायरल

Boom HT Marathi
Published Jun 18, 2024 08:19 PM IST

Tejashwi Yadav Viral Video: तेजस्वी यादव यांनी तेजस्वी यादव यांनी पत्रकारांशी संवाद साधत असल्याचा दावा केला जात आहे.

 तेजस्वी यादव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
तेजस्वी यादव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Tejashwi Yadav Video: बिहारचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत आहेत. परंतु, तेजस्वी यादव यांची भाषा दारुच्या नशेत मद्यधुंद असलेल्या व्यक्तीसारखी आहे. हा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांच्या मते तेजस्वी यादव हे दारूच्या नशेत पत्रकारांना संवाद सांधत आहे. मात्र, या व्हिडिओमागील सत्य समोर आले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तेजस्वी यादव म्हणत आहेत की, “बघा, आम्ही आत्ताच विमानातून उतरलो आहोत. पण ज्या पद्धतीने जागा वाटप झाली, त्यावरून कोणते खाते कोणाला देतात, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अवलंबून आहे. कोणतेही काम असो, ते व्यवस्थित झाले पाहिजे. बिहारमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. मात्र, हा व्हिडिओ शेअर करताना एका युजर्सने तेजस्वी यादव दारूच्या नशेत असल्याचे बोलले आहे. युजर्सने आपल्या कॅप्शनमध्ये 'राष्ट्रीय जनता दलाचा रोड रेड नेता. झूम बराबर झूम शराबी' असे लिहिण्यात आले आहेत. परंतु,या व्हिडिओबाबत तपासणी केली असता हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर शेअर केला जात असल्याचे निष्पन्न झाले

 

Fact Check
Fact Check

या बातमीसंदर्भात अधिक पोस्ट पाहण्यासाठी येथे आणि येथे क्लिक करा

जाणून घ्या सत्य

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत तपासणी केली असता युट्यूबवर तेजस्वी यांच्या मुलाखतीचे अनेक व्हिडिओ समोर आले. पण व्हायरल होत असलेला व्हिडिओ ११ जूनला अपलोड करण्यात आला. या व्हिडिओमध्ये तेजस्वी स्पष्टपणे आपले मत व्यक्त करताना दिसत आहेत. इतर व्हिडिओच्या तुलनेत या व्हिडिओचा वेगही थोडा अधिक आहे. यावरून हे स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडीओचा वेग कमी करण्यात आल्याने तेजस्वीच्या बोलण्यात तोतरेपणा दिसत आहे. तेजस्वीचा मूळ व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता.

तेजस्वीच्या या मुलाखतीशी संबंधित अनेक बातम्याही आम्हाला मिळाल्या. 'हिंदुस्थान'च्या बातमीनुसार, तेजस्वी मंत्रिमंडळ जागा वाटपाबाबत तिसऱ्यांदा निवडून आलेल्या मोदी सरकारला टोमणे मारत होते की, मोदींना पंतप्रधान बनवणाऱ्या बिहारची महत्त्वाची भूमिका आहे. दरम्यान, १० जून २०२४ रोजी त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावर एक व्हायरल व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी लिहिले की, बिहारमधून निवडून आलेल्या खासदारांना मंत्रिमंडळात दिलेली खाती महत्त्वाची नाहीत.

निष्कर्ष- तेजस्वीचा व्हायरल व्हिडिओ स्लो मोशनमध्ये शेअर करून तो मद्यधुंद असल्याचा खोटा दावा केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात Boom ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर