Allu Arjun News: चित्रपटगृहात विक्रमी कमाई केल्यानंतर आता दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्प-२' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. बॉक्स ऑफिसवर १८३० कोटींची कमाई करणाऱ्या साऊथच्या या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटाच्या कमाईचा मोठा भाग हिंदी व्हर्जनमधून आला होता. चित्रपटाच्या तमिळ आवृत्तीनंतर सर्वाधिक कमाई हिंदी आवृत्तीतून झाली. पण तुम्हाला माहित आहे का, अल्लू अर्जुनला बॉलिवूड हा शब्द आवडत नाही. याचा अर्थ त्याला उत्तर भारतातील चित्रपटसृष्टीचा तिरस्कार आहे, असा होत नाही. खरं तर त्याने एका कार्यक्रमात सांगितले होते की, त्याला 'बॉलिवूड' हा शब्द आवडत नाही, उलट त्याला 'हिंदी सिनेमा' म्हणायला आवडते.
अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार यांनाही त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान बॉलिवूडकडून बरीच मदत मिळाली. कारण दोन मोठे सिनेमे एकमेकांना भिडू नयेत म्हणून अल्लू अर्जुनने बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाशी चर्चा केली होती. खरं तर अल्लू अर्जुनचा पुष्पा-२ हा चित्रपट आणि एक मोठा चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होणार होता. दोघांनी ही प्रदर्शनासाठी ६ डिसेंबरची तारीख निवडली. अल्लू अर्जुनने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, आपल्या एका कॉलवर हिंदी सिनेमाच्या या दिग्दर्शकाने आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली होती, जेणेकरून दोन्ही चित्रपट क्लॅश होऊ नये.
अल्लू अर्जुन म्हणाला की, 'चित्रपटसृष्टीकडून खूप पाठिंबा मिळत आहे. मला आठवत आहे की, एकदा मी बॉलिवूडच्या एका फिल्ममेकरला फोन केला होता… हिंदी सिनेसृष्टीतील चित्रपट निर्माते…बॉलीवूड हा शब्द मला आवडत नाही. मी त्या फिल्मफेकरला फोन करून त्यांच्या चित्रपटाची तारीख बदलण्यास सांगितली. त्यांनीही लगेच होकार देत आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली. नंतर मी त्याला फोन करून त्यांचे आभार मानले.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या चित्रपटासोबतच विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपटही प्रदर्शित होणार होता, ज्याच्या प्रदर्शनाची तारीख नंतर निर्मात्यांनी बदलली होती. विकी कौशल आता १४ फेब्रुवारीला आपला चित्रपट घेऊन येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने आधीच धुमाकूळ घातला असून आता बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो? हे पाहावे लागणार आहे. या पीरियड ड्रामा चित्रपटाची कथा छत्रपती संभाजी महाराज यांची आहे.
संबंधित बातम्या