Allahabad University : अलाहाबाद विद्यापीठात हिंसाचार; वाहनांची तोडफोड व जाळपोळीनंतर पोलीस तैनात
Allahabad University violence : शुल्क वाढीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चावेळी विद्यार्थी व सुरक्षा रक्षकात झालेल्या वादावादीतून वाहनांची जाळपोळ व तोडफोडीची घटना घडली.
Allahabad University violence: अलाहाबाद विद्यापीठात आज प्रचंड गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांनी शुल्क वाढीच्या विरोधात केलेल्या आंदोलनादरम्यान सुरक्षा रक्षक व विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला व त्याचे पर्यावसान वाहनांची जाळपोळ आणि तोडफोडत झाले. प्रयागराजमध्ये अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी शुल्क वाढीच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर विद्यापीठ परिसरात हिंसाचार उफाळला.
ट्रेंडिंग न्यूज
अलाहाबाद विद्यापीठातील कला परिसरात सोमवारी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी एका माजी विद्यार्थी नेत्याशी गैरवर्तणूककरत त्यालामारहाणही केल्याने हा हिंसाचार उसळल्याची माहिती मिळत आहे.
विद्यार्थी आणि सुरक्षारक्षकांमध्ये झालेल्या जोरदार दगडफेकीत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून यावेळी सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या हिंसाचारानंतर विद्यापीठात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंसाचाराच्या घटनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने उद्या म्हणजे मंगळवारी सुट्टी जाहीर केली आहे.
विद्यार्थ्यांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये तोडफोड करण्यासोबतच काही वाहने पेटवून दिली. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केल्याचा आरोप करत विद्यापीठ परिसरात उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या.
संबंधित बातम्या