मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pregnancy Job : महिलांना प्रेग्नेंट करण्याची नोकरी, १० लाख पगार? नेमका काय आहे हा प्रकार?

Pregnancy Job : महिलांना प्रेग्नेंट करण्याची नोकरी, १० लाख पगार? नेमका काय आहे हा प्रकार?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 19, 2024 03:21 PM IST

Pregnant Job Facebook Advertisement: फेसबुकवर व्हायरल झालेल्या महिलांना प्रेग्नेंट करणाऱ्या नोकरीच्या जाहिरातीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 pregnant women
pregnant women (Freepik)

Pregnant Job Scam: भारतात गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगारांनी नोकरी, बक्षीस किंवा आकर्षक जाहिरातीद्वारे अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. सध्या सोशल मीडियावर 'ऑल इंडिया प्रेग्नंट जॉब सर्व्हिस' नावाची एक जाहिरात वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली आहे. या जॉबसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

फेसबूकवर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला सांगत आहे की, ती विवाहित आहे. परंतु, पतीच्या आरोग्याच्या समस्येमुळे ती बाळाला जन्म देऊ शकत नाही. पुढे महिलेने असे म्हटले आहे की, जो कोणी तिला प्रेग्नेंट करेल, त्याला ती १० लाख रुपये देईल. व्हिडिओच्या शेवटी एका पुरुषाचा आवाज ऐकू येतो, जो या जॉबबद्दल माहिती देत आहे. तसेच कोणताही व्यक्ती या जॉबसाठी अप्लाय करू शकतो, असे सांगितले जात आहे.

आतापर्यंत अनेक जण या स्कॅमच्या जाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणी बिहार पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. मात्र, तरीही फेसबूकवर अशा जाहिराती दाखवल्या जात आहेत. सहज पैसे कमवण्याच्या नादात अनेकांचं आर्थिक नुकसान झालं आहे. या स्कॅममध्ये अडकलेल्या बऱ्याच लोकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तुम्हीही अशा स्कॅमचे बळी ठरले असाल तर लगेच जवळच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार द्यावी किंवा नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर ऑनलाईनद्वारे तक्रार नोंदवावी. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दोषींविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. मात्र, तरी देखील अशा घटना सुरूच आहेत.

WhatsApp channel

विभाग