मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सावधान! Google वर चुकूनही सर्च करू नका पॉर्न साइट, मोठ्या संकटात फसाल; वाचा कसे?

सावधान! Google वर चुकूनही सर्च करू नका पॉर्न साइट, मोठ्या संकटात फसाल; वाचा कसे?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 17, 2024 08:32 PM IST

Googal Chrome Incognito Mode : युजर्स इन्कॉग्निटो मोडमध्ये यामुळे सर्च करतात जेणेकरून त्यांची प्रायव्हरी कायम राहील व कोणतीही थर्ड पार्टी वेबसाइट त्याला ट्रॅक करू शकणार नाही. मात्र गूगल युजर्संना धोका देत आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

काय तुम्हीही काही पर्सनल सर्च करण्यासाठी गूगल क्रोमच्या इनकॉगनिटो मोडचा वापर करताय?  तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा. Google विरुद्ध एका खटल्याच्या माध्यमातून समजले हे की,  कंपनी इनकॉगनिटो मोडमध्येही आपली सर्च हिस्ट्री ट्रॅक करते. Google ने गुपचूपपणे आपल्या  इनकॉगनिटो मोडच्या पेजवर दिलेले डिटेल्सही बदलले आहेत. यामुळे युजर्सची चिंता वाढते की, आता प्रायव्हेट ब्राउझिंग प्रायव्हेट राहिलेली नाही.

Google Chrome चे इनकॉगनिटो मोड ब्राउझर हिस्ट्री सेव्ह न करण्याचा एक प्रायव्हेट वेब सर्फ करण्याची वेगवान पद्धत आहे. सामान्यपणे लोक इन्कॉग्निटो मोडमध्ये यामुळे सर्च करतात जेणेकरून त्यांची प्रायव्हरी कायम राहील व कोणतीही थर्ड पार्टी वेबसाइट त्याला ट्रॅक करू शकणार नाही. मात्र गूगल युजर्संना धोका देत आहे. 

Google कंपनी सन २०२० पासून ५ बिलियन डॉलरच्या कायदेशील लढाईचा सामना करत आहे.  यूजर्सच्या एका ग्रुपने आरोप केला आहे की, क्रोम ब्राउज़र गोपनीयपणे डेटा ट्रॅक करत आहे. दरम्यान कंपनीने न्यायालयात या गोष्टीचा इन्कार केला आहे. मात्र शेवटी Google ने  तक्रार कर्त्याला नुकसान भरपाई देऊन प्रकरण मिटवले. हे प्रकरण न वाढवता कंपनीने आपला गुन्हा कबूल करून ५ बिलियन डॉलरची नुकसान भरपाई देऊन कायदेशीर लढाईतून माघार घेतली.

..तर गूगल करणार ट्रॅक- 

विंडोजच्या गूगल क्रोमच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये इनकॉग्निटो मोडमध्ये पेज डिस्क्रिप्शन असे असते की, जर दुसरे कोणी तुमचे डिव्हाईस हाताळत असेल तर ते तुमची एक्टिविटी पाहू शकणार नाही. म्हणजे तुम्ही आणखी प्रायव्हेटली ब्राउझिंग करू शकला. कंपनीने स्पष्ट केले आहे की, जर तुम्ही इनकॉग्निटो मोडवर काही ब्राउझ केले तर गूगल त्याला ट्रॅक करू शकेल. या मोडवर प्रायव्हसी सुधारण्याऐवजी कंपनीने डिस्क्रिप्शन अपडेट करण्याचा निर्णय घेतला. यामुळे स्पष्ट होते की, प्रायव्हेट मोड इतकेही प्रायव्हेट नाही. 

WhatsApp channel