मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  IRCTC Ticket Booking : चुकूनही करू नका IRCTC ID वरून दुसऱ्यांसाठी Train Ticket बुक, अन्यथा जावे लागेल जेल

IRCTC Ticket Booking : चुकूनही करू नका IRCTC ID वरून दुसऱ्यांसाठी Train Ticket बुक, अन्यथा जावे लागेल जेल

Jun 19, 2024 08:50 PM IST

IRCTC Ticket Booking Rule: जर तुम्ही रेल्वेतून प्रवास करण्याआधी IRCTC वरून तिकीट बुक करत असाल तर रेल्वेचा हा नियम तुम्हाला माहिती असावा. IRCTC आयडीवरून दुसऱ्याचे तिकीट बुक केल्यास १० हजार रुपये दंड किंवा ३ वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.

Railway Rules
Railway Rules

IRCTC Ticket Booking Rule: जर तुम्ही ट्रेनने प्रवास करण्यासाठी IRCTC वरून तिकीट बुक करत असाल तर रेल्वेच्या नियमांबद्दल जाणून घ्या. अनेक लोक आपल्या IRCTC अकाउंटवरून कोणासाठीही ट्रेनचे तिकीट बुक करत असतात. मात्र असे करणे तुम्हाला अडचणीचे ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला IRCTC च्या या नियमाबद्दल सांगणार आहोत. 

होऊ शकता ३ वर्षाचा कारावास आणि १० हजारांचा दंड 

IRCTC अकाउंटवरून आपल्या मित्रांसाठी आणि नातेवाईकांसाठी ट्रेन तिकीट बुक करणे कायद्याने गुन्हा आहे.   रेलवे एक्ट सेक्शन १४३ नुसार  दुसऱ्या कोणासाठी ट्रेनचे तिकीट केवळ तोच व्यक्ती काढू शकतो ज्यांना ऑफिशियली रेल्वेने हे काम दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जर कोणी सामान्य व्यक्ती आपल्या पर्सनल IRCTC आयडीवरून दुसऱ्या कोणाचे जर तिकीट  बुक केल्यास त्याच्यावर १० हजाराचा दंड आकारला जाईल. किंवा ३ वर्षाचा कारावास होऊ शकतो.  आपल्या पर्सनल  IRCTC आयडी वरून तुम्ही केवळ आपल्या रक्तातील नात्यातील व्यक्तींचे तसेच एकच आडनाव असलेल्या व्यक्तींचे तिकीट बुक करू शकता. 

नार्मल IRCTC ID वरून महिन्याला २४ तिकीट बुकिंगची मर्यादा -

एका IRCTC ID वरून महिनाभरात २४ तिकीटे बुक केली जाऊ शकतात. त्याचबरोबर हे तेव्हाच करू शकता जेव्हा तुमची यूजर आयडी तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल. जर तुमचे यूजर आयडी आधारशी लिंक नसेल तर महिन्याला तुम्ही केवळ १२ तिकीटे बुक करू शकता.

काय आहे रेल्वेची कवच प्रणाली?

टक्करविरोधी कवच प्रणाली ही स्वयंचलित ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) प्रणाली आहे, जी रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्डऑर्गनायझेशन (आरएससीओ) आणि इतर भारतीय कंपन्यांनी भारतात विकसित केली आहे. चालकाने वेळीच ब्रेक लावला नाही तर गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवणे हे त्याचे प्राथमिक वैशिष्ट्य आहे.

कवच प्रणाली लोकोमोटिव्ह चालकांना ट्रॅकवरील धोक्याचे सिग्नल ओळखण्यास मदत करते आणि कमी दृश्यमानतेच्या भागात गाड्या चालविण्यास देखील मदत करते. ही प्रणाली प्रामुख्याने रुळ आणि स्टेशन यार्डवर लावलेल्या आरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन) टॅगच्या मदतीने कार्य करते, जे गाड्या आणि त्यांच्या दिशा शोधू शकते.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर